शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

कोरोना; 31 टक्के पॉझिटिव्हिटी धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 5:00 AM

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात प्रमाण जास्त होते. माार्चअखेरीस शहरातील प्रमाण कमी होऊन ग्रामीणमधील रुग्णसंख्या वाढायला लागली. ग्रामीणमधील वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव तालुके आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाने ११० गावे सील करण्यात आलेली आहेत.

ठळक मुद्देदहा दिवसांपासून प्रमाण वाढतेच, ग्रामीण भागात स्फोटक स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना चाचण्यांमध्ये कमी आलेली आहे. मात्र, यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढतेच असल्याचे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दहा दिवसांत  सरासरी २६ टक्क्यांवर व बुधवारी ३२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांद्वारा कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात प्रमाण जास्त होते. माार्चअखेरीस शहरातील प्रमाण कमी होऊन ग्रामीणमधील रुग्णसंख्या वाढायला लागली. ग्रामीणमधील वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव तालुके आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाने ११० गावे सील करण्यात आलेली आहेत. यामध्ये चिखलदरा तालुक्यात चुर्णी, डोमा, काटकुंभ, खंडूखेडा, चिखली, सेमाडोह, चिखलदरा व हतरू ही गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आलेली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोखड, गौरखेडा, तिवसा तालुक्यात वणी, सातरगाव, वाठोडा, कुऱ्हा, मोझरी, गुरुदेवनगर व सुरवाडी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात चिंचोना, चौसाळा, विहिगाव, कारला व कुंभारगाव, भातकुली तालुक्यात कवठा बहाळे, जावरा, कानफोडी व भातकुली तसेच दर्यापूर तालुक्यात  चंडिकापूर व दर्यापूर येथील शिवाजीनगर व साईनगर कंटेन्मेट आहेत.चांदूरबाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव, करजगाव व प्रल्हादपूर, चांदूर् रेल्वे तालुक्यात मुंडगाव, सातेफळ, बागापूर, कळमगाव व कळमजापूर, अमरावती तालुक्यात वलगाव, अंजनगाव बारी, नांदगाव पेठ, गजानन टाऊनशीप, प्रिंप्री यादगिरे व डवरगाव तसेच धामणगाव तालुक्यात हिरपूर, चिंचोली, सोनगाव खर्डा, आजनगाव, पांडे लेआऊट, जुना धामणगाव, कळासी, देवगाव अंजनवती व सुलतानपूर कंटेन्मेंट आहेत.

मोर्शी, धारणी तालुक्यात २९ गावे हॉटस्पॉटमोर्शी तालुक्यात चिखलसावंगी खानापूर, पिंपळखूटा, आष्टगाव, दहसूर, हिवरखेड, पार्डी, मायवाडी, पाला, दापोरी, डोंगरयावली, खॅपडा, रिद्धपूर, खेड, तरोडा, नेरिपंगळाई, शिरुर व दाभेरी तसेच धारणी तालुक्यात हरिसाल, साद्राबाडी, बिबामल, कुसुमकोट, झिल्पी, रोणेगाव, सावलीखेडा, बेडाबू, चार्कदा, दिया, हरिहरनगर आदी गावे कंटेन्मेंट आहेत.

अचलपूर, वरूड तालुक्यांत २१ गावे कंटेनमेंट अचलपूर तालुक्यात कांडली, देवमाळी, नारायणपूर, आरेगाव, गौरखेडा, कुंभी, रविनगर कुंभी, सावळी धतुरा, हनवतखेडा, तसेच वरूड तालुक्यात  टेंभूरखेडा, जरूड, वाठोडा, शेंदूरजना घाट, पुसला, राजुरा बाजार, बेनोडा, लोणी, आमनेर, सुरळी, आामडापूर व ढगा कंटेन्मेंट झोन आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या