मका खरेदी मुदतीपूर्वी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:52+5:302020-12-30T04:17:52+5:30

सेकंड लिड पान २ हजारो क्विंटल धान्य विक्रीची प्रतीक्षा : शेतकऱ्यांची फरफट धारणी : आदिवासी विकास महामंडळातर्फे सुरू करण्यात ...

Corn closed before purchase deadline | मका खरेदी मुदतीपूर्वी बंद

मका खरेदी मुदतीपूर्वी बंद

सेकंड लिड पान २

हजारो क्विंटल धान्य विक्रीची प्रतीक्षा : शेतकऱ्यांची फरफट

धारणी : आदिवासी विकास महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेली मका खरेदी मुदतीपूर्वीच बंद करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी पद्धतीने मका खरेदी करण्यात येणार असल्याचे महामंडळाने कळविले होते.

ऑनलाइन पद्धतीने मका खरेदी न करता निकटवर्तीय व व्यापाऱ्यांचा मका बोगस सात-बारावर खरेदी करण्यात येत असल्याचे आक्षेप घेण्यात आले. शेतकरी पैसे खर्च करून येथे मका विक्रीस आणत होता. मका खरेदीची मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु, महामंडळातर्फे २७ डिसेंबरपासून खरेदी बंद करण्यात आली. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल मका खरेदी केंद्रावर पडून आहे.

रात्रंदिवस आपल्या मालाचे संरक्षण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष पाहावयास मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मका खरेदीला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासावे आणि यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे चुकारे तात्काळ द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

Web Title: Corn closed before purchase deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.