आचाऱ्याने केली वधुपक्षाची फसवणूक
By Admin | Updated: May 20, 2015 01:04 IST2015-05-20T01:04:23+5:302015-05-20T01:04:23+5:30
स्थानिक बबनराव वडस्कर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी पाहुण्यांच्या जेवणाकरिता अमरावतीच्या एका कॅटरर्स चालकाला ठेका दिला होता.

आचाऱ्याने केली वधुपक्षाची फसवणूक
वरुड : स्थानिक बबनराव वडस्कर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी पाहुण्यांच्या जेवणाकरिता अमरावतीच्या एका कॅटरर्स चालकाला ठेका दिला होता. आचाऱ्याला ९१ हजार रुपयेसुध्दा दिले होते. परंतु विवाहाच्या दिवशी सदर आचाऱ्याने दगा दिल्याने वधूपक्षाची चांगलीच फजिती झाली. आचाऱ्याने त्यांची फसवणूक केल्याने आचाऱ्याविरुध्द वरुड आणि अमरावती ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक यावलकरवाडी येथील बबनराव वडस्कर यांच्या मुलीचा विवाह काठीवाले सभागृहात ६ मे २०१५ रोजी ठरला होता. याकरिता पाहुण्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी अमरावती येथील दीपक शर्मा (रा. सबनिस प्लॉट) या आचारी तसेच कॅटर्सला एक लाख ५१ हजार रुपयांत ठेका दिला होता. त्यामध्ये जेवणाचे मेनू आणि नाश्ता सर्व व्यवस्था नमूद करण्यात आली. किराणा साहित्य घेण्याकरिता ४० हजार रुपेय तसेच एक हजार अॅडव्हांस आणि ५० हजार रुपये रोख असे एकूण ९१ हजार रुपये वधूपित्याने दीपक शर्मा यालाा दिले. ६ मे रोजी स्थानिक काठीवाले सभागृहात विवाहसोहळा पार पडणार असल्याने आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमादरम्यान ५ मे रोजी दूरध्वनीवरुन वधूपिता बबनराव वडस्कर तसेच त्यांचे साडूभाऊ नामदेवराव घोरमाडे यांनी संपर्क साधला असता मोबाईल बंद होता. अनेकवेळा संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वधूपित्यासह नातेवाईकांची तारांबळ उडाली. अखेर नातेवाईकांनी एकमेकांना ध्ीार देत रात्रीतून पुन्हा जेवणासह चहा, नाश्त्याची पाहुण्यांकरिता तातडीने व्यवस्था केली.
वधूपिता रुग्णालयात दाखल
वरुड : वधूपित्याला धक्का बसल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. यासंदर्भात वधूपिता बबनराव वडस्कर यांनी वरूड ठाण्यात तर साडूभाऊ यांनी आचाऱ्यावरिुध्द अमरावती येथे लेखी तक्रार दिली आहे. आचारी दीपक शर्मा रा.सबनिस प्लॉट, महादेवखोरी याचे घरी जाऊन शोध घेतला असता घरी आढळून आला नाही. आचारी शर्मा याचे पत्नी, जावई यांनी घरी नसल्याचे सांगितले. विवाह सोहळ्यातील कॅटरींगच्या ठेक्याचे ९१ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. यापूर्वीदेखील त्यांनी अनेकांना कॅटरींगच्या नावावर गंडविल्याचेही बबनराव वडस्कर यांनी ंसांगितले. आचाऱ्याविरोधात अमरावती व वरुड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)