विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला

By Admin | Updated: February 9, 2017 00:05 IST2017-02-09T00:05:21+5:302017-02-09T00:05:21+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात होणार आहे.

The convocation of the University on 23rd February | विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात होणार आहे. समारंभाच्या निमित्ताने विविध विद्याशाखेतील विद्यार्थी पदवी घेण्यासाठी विद्यापीठात येतील. समारंभाला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल सी.विद्यासागर राव उपस्थित राहतील.
पदवी स्वीकारल्यानंतर पदवीसह फोटो काढण्याची विद्यार्थ्यांना सोय व्हावी, यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठ परिसरातच फोटो स्टुडिओची व्यवस्था केली जाणार आहे. पदवीधारकांचे फोटो काढण्यासाठी स्टुडिओ उभारावयाचे असल्यास त्यांना विद्यापीठ परिसरातच विशिष्ट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतर व्यवस्था मात्र संबंधित फोटो स्टुडिओधारकांना करावी लागेल. इच्छुक स्टुडिओधारकांनी २० फेब्रुवारीपर्यंत जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत. यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The convocation of the University on 23rd February