शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारी राेजी सकाळी ११ वााजता ऑनलाईन आयोजित करण्यात येणार ...

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत सोहळा २१ फेब्रुवारी राेजी सकाळी ११ वााजता ऑनलाईन आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनातून ऑनलाईन, तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे प्रत्यक्ष उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.

विद्यापीठाच्या के. व्ही. देशमुख सभागृहात दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मंचावर प्रमुख पाहुण्यांसह कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, वित्त व लेखाधिकारी भारत कऱ्हाड, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, वैशाली गुडधे, एस.व्ही. डुडुल यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहे. मंचावर कोरोना नियमावलींचे पालन करून आसनव्यवस्थेचा आढावा कुलगुरू चांदेकर यांनी सोमवारी घेतला. मंचावर २० अथवा २३ खुर्च्या असतील, अशी तयारी केली जात आहे. राज्य शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून दीक्षांत सोहळ्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वे मागविली जाणार आहेत. दीक्षांत सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. पीएच.डी.धारक, पदवी, पुरस्कारप्राप्त गुणवंत असे सुमारे ७५ विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे. सभागृहात दीक्षांत सोहळ्याच्या पत्रिकेशिवाय प्रवेश असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.