शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य टाकण्यासाठी महापालिका बसविणार कंटेनर

By admin | Updated: September 8, 2016 00:24 IST

अंबानगरीत घराघरांत सोमवारी गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले.

सामाजिक उपक्रम : विसर्जनाच्या ठिकाणीही करण्यात येणार व्यवस्थाअमरावती : अंबानगरीत घराघरांत सोमवारी गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. हिंदू संस्कृतीत अतिशय श्रद्धेने गणरायाची पूजा-अर्चना केली जाते. या पूजेसाठी लागणारी फुले, दुर्वा, व इतर निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी कंटेनर व निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.शहरातील गणेश विर्सजन ज्याठिकाणी करण्यात येणार आहे. त्या छत्री तलाव, वडाळी तलाव याठिकाणी निर्माल्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार असून काही कृत्रिम तलाव सुद्धा तयार करण्यात येणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरण निमुुर्लन करण्यासाठी काही सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. स्वच्छता ठेवण्याच्या अनुषंगाने याकरीता गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माल्यातून खतनिर्मिती करण्याचाही महापालिकेचा मानस आहे. तसेच निर्माल्यासोबत काही वेस्टज मटेरियल येत असेल तर ते वेगळे काढण्यात येईल व उर्वरीत फुले, दुर्वा व इतर पूजा साहित्यातून खत निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग व बांधकाम विभाग कामाला लागला आहे. पर्यावरण विभागाचेही या उत्सवावर विशेष लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)निर्माल्य कंटेनर मध्येच टाकावे? गणरायांच्या उत्साहात कुठलीही गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका सज्ज झाली आहे. वरिष्ठांची बैठकही यासंदर्भात पार पडली. महापालिकेच्यावतीने काही ठिकाणी अधिकृतरित्या निर्माल्य टाकण्यासाठी कंटेनर लावण्यात येणार असून काही सामाजिक संघटनांचा सहभाग घेऊन निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचे विचाराधीन आहे. त्याकरीता नागरिकांनी अधिकृत कंटेनरमध्येच निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. पर्यावरण निमुर्लनासाठी निर्माल्यापासून खत निर्मीती करण्याचा मानस आहे. त्यासाठी काही सामाजिक संघटनांची मदत घेण्यात येणार आहे.- महेश देशमुख पर्यावरण विभाग महापालिका