ग्राहक पंचायतचे पालिकेला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST2020-12-05T04:18:01+5:302020-12-05T04:18:01+5:30
चांदूर रेल्वे : शहरातील विविध समस्यांसंदर्भात तालुका ग्राहक पंचायतच्यावतीने पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील अतिक्रमण हटवून तेथे बसणाऱ्या ...

ग्राहक पंचायतचे पालिकेला निवेदन
चांदूर रेल्वे : शहरातील विविध समस्यांसंदर्भात तालुका ग्राहक पंचायतच्यावतीने पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील अतिक्रमण हटवून तेथे बसणाऱ्या दुकानदारांना योग्य ती जागा देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालावा या दृष्टिकोनातून योग्य तो पर्याय काढावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी संकुल, मेन रोड येथे मुत्रीघराची व्यवस्था करावी व सदर संकुलातील दुकानांचा तात्काळ लिलाव करण्यात यावा. शहरात डुकरांना आवर घालावा. दर रविवारी भरणारा आठवडी बाजार हा दिलेल्या जागेत न भरता अमरावती रोड व शहरातील मेन रोडवरच भरतो. परंतु, नगर परिषद करून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर बसण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
-----------------