परतवाड्यातील पांढऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:28+5:302020-12-17T04:39:28+5:30

नगर परिषदेने पाईपलाईनच हटवली नाही, अनिल कडू परतवाडा : शहरातील बिच्छन नदीवरील पांढऱ्या पुलाचे बांधकाम नऊ महिन्यांपासून रखडले ...

Construction of the white bridge in the backyard stalled | परतवाड्यातील पांढऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

परतवाड्यातील पांढऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

नगर परिषदेने पाईपलाईनच हटवली नाही,

अनिल कडू

परतवाडा : शहरातील बिच्छन नदीवरील पांढऱ्या पुलाचे बांधकाम नऊ महिन्यांपासून रखडले आहे. पुलावरून गेलेली पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन अचलूपर नगरपालिकेने न हटवल्यामुळे ते पुलाचे का थांबले आहे.

पुलाचे बांधकाम थांबल्यामुळे पुलाला जोडणाऱ्या रस्त्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. या जोड रस्त्यासह पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांसह वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अंजनगाव-परतवाडा-बैतूल मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम घेण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. २७० कोटीहून अधिक खर्चाच्या या महार्गाचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. पण याच मार्गावरील परतवाडा शहरातील बिच्छन नदीवरून जूना ब्रिटिशकालीन स्वातंत्र्यपूर्वकाळातील पांढरा पूल काढून नवा पूल बांधण्याच्या कामास अद्याप सुरुवातच झालेली नाही.

या पांढऱ्या पुलावरून शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेली आहे. ही पाईप ईन काढावी. याकरिता रस्ते महामार्ग अभियंत्याने १२ फेब्रुवारी अचलपूर नगर परिषदेला पत्र दिले. यावर उशिराने नगर परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही पाईपलाईन शिफ्ट करण्याकरिता २४ ऑगस्टला नगर परिषदेला तांत्रिक मंजूरात मिळाली.

मंजुरी मिळाल्यानंतर तीन निविदा प्रकाशित करूनही नगरपरिषदेला कंत्राटदार मिळाला नाही. म्हणून पाणी पुरवठ्याची ती पाईपलाईन नगर परिषदेकडून संबंधित यंत्रणेला काढून मिळालेली नाही. यात त्या पुलाचे बांधकाम नऊ महिन्यांपासून सुरूच होऊ शकलेले नाही.

बॉक्स

एकाच ठिकाणी दोन पूल

शहरातून जाणाऱ्या या बिच्छन नदीवर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सर्वप्रथम हा पांढरा पूल बांधला. स्वातंत्र्यानंतर शहरातील वाहतूक वाढली. म्हणून अगदी या पुलाला लागूनच १९९७ मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने दुसरा पुल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी, तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केली गेली. सन १९९७ पासून ही व्यवस्था शहरात अस्तित्वात आली. परंतु सन २०१७ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाला. राष्ट्रीय महामार्गांतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केल्या गेले. यातच या पांढाऱ्या पुलाचे बांधमाक प्रस्तावित करण्यात आले आहे.

कोट

पांढऱ्या पुलावरील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लवकरच शिफ्ट करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेची फाईल नगर परिषदेच्या निविदा समितीपुढे ठेवण्यात आली आहे. स्वाक्षरी होताच कामास प्रारंभ केल्या जाईल.

- मुन्शीराम पोटे, अभियंता, स्वच्छता व आरोग्य विभाग, न.प.अचलपूर

Web Title: Construction of the white bridge in the backyard stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.