कामगार आयुक्तांकडून फिनलेच्या कामगारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:08+5:302021-07-21T04:11:08+5:30
पूर्ण पगार देण्याचे निर्देश परतवाडा : फिनले मिलच्या कामगारांना पूर्ण वेतन देण्याचे निर्देश क्षेत्रीय कामगार आयुक्त नागपूर यांनी मंगळवार, ...

कामगार आयुक्तांकडून फिनलेच्या कामगारांना दिलासा
पूर्ण पगार देण्याचे निर्देश
परतवाडा : फिनले मिलच्या कामगारांना पूर्ण वेतन देण्याचे निर्देश क्षेत्रीय कामगार आयुक्त नागपूर यांनी मंगळवार, २० जुलै रोजी मिल प्रबंधकांना दिलेत.
लॉकडाऊनच्या काळात मिल कामगारांना केवळ अर्धे वेतन दिले गेले. काहींना तेही मिळाले नाही. मिल सतत बंद ठेवून कामगारांना उपाशी ठेवले जात असल्याचे बघून गिरणी कामगार संघाने प्रकरण क्षेत्रीय कामगार आयुक्त नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावर २० जुलैला सुनावणी पार पडली. यात मिल बंद असलेल्या स्थितीत केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार कामगारांना पूर्ण वेतन देण्यात यावे. नियमानुसार पूर्ण वेतन देणे अनिवार्य आहे, असे लिखित निर्देश कामगार आयुक्तांनी यादरम्यान दिलेत.
फिनले मिलमध्ये शंभर टक्के शेअर केंद्र सरकारचे असल्यामुळे या मिलला सर्व कायदे केंद्र सरकारचे लागू होतात. बीआरआय कायदा यात लागू होत नाही, असे कामगार आयुक्तांनी सुनावणीदरम्यान बजावले. यादरम्यान मिल प्रबंधनांच्यावतीने मिल महाप्रबंधक अमित सिंह व कामगार अधिकारी विपिन मोहने यांनी आपली बाजू मांडली. कामगारांच्या वतीने अर्जदार अध्यक्ष मनीष लाडोळे, सचिव विलास चावरे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, अभय माथने, धनंजय लव्हाळे, नरेंद्र बोरकर, राजेश ठाकूर, धर्मा राऊत, दिनेश उघडे व सचिन जिचकार उपस्थित होते.
दि.20/7/21 फोटो