जिंकूया क्षयरोगाची लढाई!
By Admin | Updated: March 23, 2015 23:57 IST2015-03-23T23:57:18+5:302015-03-23T23:57:18+5:30
क्षयरोग हा आपल्याकडे असणारा एक अत्यंत जुनाट रोग आहे.

जिंकूया क्षयरोगाची लढाई!
वैभव बाबरेकर अमरावती
क्षयरोग हा आपल्याकडे असणारा एक अत्यंत जुनाट रोग आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१४ मध्ये ९४० रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत २ हजार २६५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.
क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलॉसीस या जिवाणुमुळे होतो. या जिवाणूचा शोध डॉ. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी लावला. प्रत्यक्ष जिवाणूच मायक्रोस्कोपमधून दाखविल्यामुळे या रोगाचे मूळ कळले. यामुळे या जिवाणूचा नाश कसा करता येईल. याचे संशोधन करण्यात शास्त्रज्ञाना उत्साह आला. पुढे स्ट्रेप्टोमायसीनचा शोध लागला. या रोगावरील उपचारात क्रांती झाली. क्षय रोगाचे जिवाणू रोग्यांचे उच्छवास, शिंकणे, खोकणे, थुंकणे या मार्गाने हवेत पसरतात. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना त्यापासून क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता असते. सुमारे ८० टक्के रुग्ण फुफ्फुसातील क्षयाचे असतात. उरलेले २० टक्क्यांत सांधे, हाडे, मणके, मेंदु, हृदय, आतडे, कातडे इ. अवयवांच्या क्षयरोगाचा संबंध आहे.
विनामूल्य उपचार
हा उपचार व तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे विनामुल्य केला जातो. तसेच औषध घेण्यासाठी रुग्णाला जास्त अंतर चालावे लागू नये म्हणून ठिकठिकाणी औषध पुरवठा करणारे डॉट्स प्रोव्हायडर नेमलेले आहेत. आता खासगी वैद्यकीय व्यवसायीक सुध्दा डॉट्स प्रोव्हायडर म्हणून कार्य करीत आहे.

रुग्णांनी खोकलतांना नेहमी तोंडावर रुमाल ठेवल्यास क्षयरोगाचा प्रसार थांबू शकतो. नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो.
-दिलीप देशमुख, वैद्यकीय व्यवस्थापक,