पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:20+5:302021-06-09T04:16:20+5:30

नांदगाव खंडेश्वर : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोल पंपावर ...

Congress protests against petrol, diesel price hike | पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

नांदगाव खंडेश्वर : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. पेट्रोल-डिझेल १०० पार, मोदी सरकार बस करा जनतेची लूटमार व इतर घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी लॉलीपॉप वाटून पेट्रोल व डिझेल दरवाढीकडे लक्ष वेधले.

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव परिक्षित जगताप, शहर अध्यक्ष अमोल धवसे, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, सचिन रिठे, सुधाकर डोंगरे, गजानन मारोटकर, मंगेश जोगे, प्रदीप ब्राह्मणवाडे, म. इद्रीस, अमोल चवाळे, राठोड, भीमराव रंगारी, अजय लाड, अक्षय गुल्हाने, उत्तम पवार, भीमराव राऊत, प्रकाश चवके, गजानन गालफाटे, गजानन घन, गोलू ठाकरे, राहुल गवाले व शहर व तालुका काँग्रेसची मंडळी उपस्थित होती.

===Photopath===

070621\img20210607124312.jpg

===Caption===

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने.

Web Title: Congress protests against petrol, diesel price hike