शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:38 IST

Amravati : वैभवने मंगळवारी सकाळीच एका एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्नाच्या एक दिवसापूर्वी मंगळवारी सकाळी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नियोजित वर बेपत्ता झाल्याने दोन्ही बाजूला खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनुसार, वैभव मोहोड हा नियोजित वर शहरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात लिपिक आहे, तर हरिभाऊ मोहोड हे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.

अमरावती येथील एका मंगल कार्यालयात वैभवचा बुधवार, १४ मे रोजी विवाह सोहळा होता. त्यानिमित्त घरी लगबग होती. बाहेरून काही साहित्य आणायचे आहे, ते घेऊन येतो, असे सांगून वैभव सकाळी घराबाहेर पडला. मात्र, सायंकाळ होत आली तरी परतला नसल्याने वरपित्याने म्हणजेच हरिभाऊ मोहोड यांनी फ्रेजरपूरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. 

यादरम्यान वैभवने मंगळवारी सकाळीच एका एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती पुढे आली. याबाबत शहरात विविध चर्चा होत आहेत. फ्रेजरपुरा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

"वैभव मोहोड बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीवरून तपास होत आहे."- नीलेश करे, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंAmravatiअमरावतीcongressकाँग्रेस