शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

'रझा अकादमीवर बंदीचे धाडस काँग्रेसमध्ये नाही; कुणाच्या इशाऱ्यावर पोलिसांवर हल्ले?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:01 IST

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला.

अमरावती : रझा अकादमीचे कुणासोबत मधुर संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. भाजपने रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी केल्यास काँग्रेसमध्ये कारवाईचे धाडसच नाही, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती दौऱ्यात केला. देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला. काँग्रेस सत्तेत असतानाच रझा अकादमीकडून मोर्चे काढले जातात. दोन समुदायांत दंगा होतो. पाेलिसांवर हल्ले केले जातात. रझा अकादमी ही कुणाची ‘बी टीम’ आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

अमरावती, मालेगाव येथील दंगलींच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.    - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री.

मोर्चाला परवानगी नाही, तर निघाला कसा?अमरावती शहरात १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या मोर्चाला परवानगी नव्हती, तर हजारोंच्या संख्येने तो निघाला कसा, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. समाजकंटकांनी परतीच्या वेळी हिंदू समाजाची दुकाने लक्ष्य केली. नासधूस केली. दगडफेक करून जखमी करण्यात आले. हा सर्व प्रकार म्हणजे राज्यात दंगे भडकाविण्याचा सुनियोजित कट आणि अराजकता पसरविण्याचा डाव होता, असा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस