मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:59+5:30
भाजपने सत्ता आणि पैशाच्या जोरावर संविधान, लोकशाहीचा अपमान करीत रात्रीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी आटोपला होता. परंतु, भाजपची ही फसवेगिरी जास्त दिवस टिकली नाही. अखेर २६ नोव्हेबर या संविधान दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायउतार होताच जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला.
राज्यात बहुमत नसताना जनतेला अंधारात ठेवत भाजपने सत्ता स्थापन केली होती. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. लोकशाहीची अवहेलना करणाऱ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात २६ नोव्हेबर रोजी जल्लोष करण्यात आला.
भाजपने सत्ता आणि पैशाच्या जोरावर संविधान, लोकशाहीचा अपमान करीत रात्रीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी आटोपला होता. परंतु, भाजपची ही फसवेगिरी जास्त दिवस टिकली नाही. अखेर २६ नोव्हेबर या संविधान दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. हे वृत्त धडकताच जिल्हा ग्रामीण काँग्रेसने मंगळवारी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटपाने जल्लोष केला. सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, वासंती मंगरोळे, प्रदीप निमकर, रवींद्र गायगोले, बिटू मंगरोळे, भागवत खांडे, किशोर किटुकले, बबलू बोबडे, सुभाष पाथरे, बच्चू बोबडे सहभागी झाले.