Cone on orange trees, charcoal | संत्राझाडांवर शंकू, कोळशी

संत्राझाडांवर शंकू, कोळशी

ठळक मुद्देउत्पादकांची तगमग : वरूड तालुक्यात आंबिया बहराच्या संत्राफळाची गळती

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुका प्रसिद्ध आहे. येथे संत्रा उत्पादककांची संख्या मोठी आहे. संत्रा अबिंया बहराला अज्ञात रोगाने ग्रासले असून, पुन्हा गळती लागली आहे. फवारणी करूनसुद्धा थांबता थांबे ना. झाडाच्या फांदींवर शंकू, पानावर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या नुकसानाला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
वरूड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल जातात. या तालुक्यातील बहुगुणी संत्रा देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. त्याची आंबट, गोड चव अख्या देशाने चाखली आहे. या तालुक्यात कधी पाणीटंचाईमुळे सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला, तर कधी कोळसा, डिंक्या रोगाने खराब झालेली झाडे तोडली गेली. त्यामुळे संत्रा उत्पादनात मोठ्ठ्या प्रमाणात घट झाल्याने पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
गतवर्षी संत्रा पिकांची स्थिती बरी असल्याने उत्पादन झाले. मात्र, व्यापाऱ्यांच्या अनास्थेमुळे कवडीमोल दराने विकावा लागला. यंदा आंबिया बहरसुद्धा कमी आहे. अनेक संकटांवर मात करीत शेतकऱ्यांना संत्रा उत्पादन घेताना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. संत्रा जागविला या उमेदीच्या काळात अबिंया बहर चांगला फुटला असताना आता गळतीचे संकट ओढवले आहे. झाडावर शंकूचा, तर पानावर कोळशीचा प्रादुर्भाव झाला असून, डिंक्या रोगानेही तोंड वर काढले आहे. त्यामुळे सत्रांबागांचे मोठे नुकसान होत आहे.

या गावात मोठे नुकसान
संत्राझाडावर शंकू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातचे पीक जाण्याची भीती संत्रा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव शेंदूरजनाघाट, तिवासघाट, टेंभूरखेडा, मालखेड, धनोडी, पुसला, सातनूर, रवाळा, वरूड, जरूड, हिवरखेड, लोणी, बेनोडा , मांगरूळी सह आदी परिसरात दिसून येते . संत्रा झाडावर शंकू रोगाबाबत व संत्रा गळती बाबत कृषी विभागाने उपाययोजना आणि मार्गदर्शन करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकयार्तुन केली जात आहे .

Web Title: Cone on orange trees, charcoal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.