माजी आमदाराविरुद्ध महिलेची अपहाराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST2021-05-15T04:12:52+5:302021-05-15T04:12:52+5:30
अमरावती : भविष्य निधीच्या रकमेत ८६ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार खासगी संस्थेतून टेलिफोन ऑपरेटर पदावरून निवृत्त झालेल्या एका ...

माजी आमदाराविरुद्ध महिलेची अपहाराची तक्रार
अमरावती : भविष्य निधीच्या रकमेत ८६ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार खासगी संस्थेतून टेलिफोन ऑपरेटर पदावरून निवृत्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.
महिलेच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी माजी आमदार श्रीकांत गोविंद देशपांडे यांच्यासह संस्थेचे हुकूम वल्लभजी कासट (६५, रा. शंकरनगर), सय्यद राजिक सय्यद गफार (५६, रा. पॅराडाईज कॉलनी), ललित ओमप्रकाश कासट (३५, रा. एकनाथपुरम), चंद्रशेखर रामदास ठाकरे (४५, रा. जनता कॉलनी), अमोल बाबाराव शिरसाट (३५, रा. गोपालनगर) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ३४अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी चौकशीला प्रारंभ केला. चौकशीअंती नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणाविषयी श्रीकांत देशपांडे यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.