शाळा-महाविद्यालयात तक्रार पेट्यांचा शो

By Admin | Updated: July 29, 2014 23:33 IST2014-07-29T23:33:57+5:302014-07-29T23:33:57+5:30

महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळा- महाविद्यालयात तक्रार पेट्या लावून त्यामध्ये प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे आदेश राज्याचे

Complaint boxes show in school and college | शाळा-महाविद्यालयात तक्रार पेट्यांचा शो

शाळा-महाविद्यालयात तक्रार पेट्यांचा शो

पेट्या धूळ खात : अनेक ठिकाणी तक्रार पेट्याच नाहीत
प्रसन्न दुचक्के - अमरावती
महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळा- महाविद्यालयात तक्रार पेट्या लावून त्यामध्ये प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी निर्गमित केले आहे. आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काही शाळा- महाविद्यालयात तक्रार पेट्या लावण्यात आल्या. परंतु या तक्रार पेट्यांची पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्या पेट्या धुळख्यात पडल्या असल्याचे सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे. पोलीस प्रशासकडून फक्त तक्रार पेट्या लावून जणू एक प्रकारे शो दाखविण्यात येत असल्याची टीका काही प्राचार्य व मुख्याध्यापकांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.
निर्भया प्रकरणानंतर संपुर्ण देश खडबडून जागा झाला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या. अतिप्रसंग, छेडखानी, विनयभंग इत्यादी घटनांवर आळा बसावा, महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्याचे पोलीस महासंचालकांनी प्रत्येक शाळा- महाविद्यालयात तक्रार पेट्या लावण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Complaint boxes show in school and college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.