मोर्शीत भाजपच्या तिकिटासाठी स्पर्धा
By Admin | Updated: June 15, 2014 23:15 IST2014-06-15T23:15:05+5:302014-06-15T23:15:05+5:30
विकासाच्या अपेक्षेने वारंवार आमदार बदलविणाऱ्या मोर्शी विधानसभा क्षेत्रात यावेळी भाजपक्षाच्या तिकिटासाठी इच्छुकांची यादी लांबलचक आहे. शिवसेनेचे बंडखोर व विदर्भ जनसंग्राम परिषदेचे संस्थापक, विद्यमान

मोर्शीत भाजपच्या तिकिटासाठी स्पर्धा
गणेश देशमुख - अमरावती
विकासाच्या अपेक्षेने वारंवार आमदार बदलविणाऱ्या मोर्शी विधानसभा क्षेत्रात यावेळी भाजपक्षाच्या तिकिटासाठी इच्छुकांची यादी लांबलचक आहे. शिवसेनेचे बंडखोर व विदर्भ जनसंग्राम परिषदेचे संस्थापक, विद्यमान आमदार अनिल बोंडे यांचा लवकरच भाजपप्रवेश झाल्यास नवल वाटू नये. भाजपच्या तिकिटासाठी बोंडे हे पक्षाबाहेरील प्रबळ दावेदार असले तरी त्यांना अनेक स्पर्धकांवर मात करावी लागणार आहे.
आमदार अनिल बोंडे हे मूळचे शिवसैनिक. जिल्हा कार्यकारिणीत उपप्रमुखपद सांभाळलेल्या बोंडे यांनी मतदारसंघ भाजपक्षाच्या वाट्याला गेल्यामुळे सेना सोडून अपक्ष उमेदवारी दाखल केली. २००९ साली ते विजयी झालेत. स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक असलेल्या बोंडे यांनी विदर्भ जनसंग्राम परिषदेची स्थापना केली. बोंडे यांच्यावर कुठल्याही पक्षाचे शिक्कामोर्तब झाले नाही. जपलेल्या निष्पक्षतेमुळे बोंडे आज भाजपक्षाच्या, शिवसेनेच्या आणि रिपाइंच्या तिकिटाचे दावेदार आहेत. बोंडे यांचा लवकरच भाजपक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा मतदारसंघात कर्णोपकर्णी आहे. मतदारसंघ भाजपाला गेला तर तिकीट बोंडे यांनाच असेल, असे हल्लीचे समीकरण आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात असलेल्या या विधानसभा क्षेत्रातून बोंडे यांनी भाजपक्षाचे रामदास तडस यांना जाहीर पाठिंबा दिला होता.