विद्यापीठात चार बिबट्यांंचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:44+5:30

विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांनी शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास चार बिबट दिसून आल्याची माहिती दिली. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर व एकंदर गर्दी कमी झाली आहे. वसतिगृहे, कुलगुरू बंगला, शैक्षणिक विभागातही सन्नाटा आहे. त्यामुळे बिबट्यांनी नजीकच्या जंगलक्षेत्रातून विद्यापीठात प्रवेश केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Communication of four leopards in the university | विद्यापीठात चार बिबट्यांंचा संचार

विद्यापीठात चार बिबट्यांंचा संचार

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणेची भंबेरी : वनकर्मचाऱ्यांची रात्रगस्त, ट्रॅप कॅमेरे लागले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक-दोन नव्हे, तर चार बिबट आढळल्याने सुरक्षा यंत्रणेची भंबेरी उडाली आहे. बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेला आहे. वनविभागाने सुरक्षेच्या अनुषंगाने रात्रीची गस्त वाढविली असून, दोन ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.
विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांनी शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास चार बिबट दिसून आल्याची माहिती दिली. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर व एकंदर गर्दी कमी झाली आहे. वसतिगृहे, कुलगुरू बंगला, शैक्षणिक विभागातही सन्नाटा आहे. त्यामुळे बिबट्यांनी नजीकच्या जंगलक्षेत्रातून विद्यापीठात प्रवेश केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठ परिसरात तसेही अधूनमधून बिबट्यांचा मुक्तसंचार ही नित्याचीच बाब झाली आहे. परंतु, एकाच वेळी चार बिबट आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. ही माहिती वनविभागाने देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने बिबट्यांचा मुक्त संचार असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावले. विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा आणि वनविभागाचे कर्मचारी संयुक्तपणे रात्रगस्त घालून बिबट्याच्या हालचालींवर नजर रोखून आहेत. त्याचा ये-जा करण्याचा मार्ग शोधून प्रतिबंधित केला जाईल.
ट्रॅप कॅमेऱ्यांची नियमित तपासणी
विद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी २५ एप्रिल रोजी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. गस्तीवरील वनकर्मचाºयांकडून या कॅमेºयांची तपासणी करण्यात येत आहे. बिबट्यांची छायाचित्रे अद्याप ट्रॅप कॅमेºयात कैद झाली नाहीत.

विद्यापीठात वनकर्मचाऱ्यांची रात्रगस्त आवश्यक केली आहे. चार जणांना यासाठी तैनात केले आहे. विद्यापीठात गस्तीबाबत तशी नोंद करण्यात येत आहे. पाणी, शिकारीसाठी वाव असल्याने बिबट्याचे जोडपे विद्यापीठ परिसरात दडून बसल्याचे संकेत आहेत.
- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी.

Web Title: Communication of four leopards in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.