कावली परिसरात सोयाबीन सवंगणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:12+5:302021-09-22T04:14:12+5:30
कावली वसाड : पावसाने उसंत घेऊन शेतमजीन थोडीफार कोरडी होताच कावली परिसरात शेतकऱ्यांनी सवंगणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. ...

कावली परिसरात सोयाबीन सवंगणीला प्रारंभ
कावली वसाड : पावसाने उसंत घेऊन शेतमजीन थोडीफार कोरडी होताच कावली परिसरात शेतकऱ्यांनी सवंगणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. बोगस बियाणांमुळे अनेकांच्या शेतातील सोयाबीनचे पीक उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. अतिपावसामुळे झाडाला शेंगा लागल्या नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात जनावरांना चारा म्हणून त्याचा उपयोग केला होता. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला फाटा देत कपाशीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. परंतु, अतिपावसामुळे कपाशीची बोंडे सडल्याने सोयाबीन पीक जेवढे शक्य होईल, तेवढ्या लवकर कापणीला सुरुवात केली आहे. दमदार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन झाडाची पाने पिवळी पडून सडू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुदतीच्या अगोदरच कापणीला सुरुवात केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.