कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत संक्रांत मेळावा
By Admin | Updated: January 25, 2016 00:19 IST2016-01-25T00:19:11+5:302016-01-25T00:19:11+5:30
लोकप्रिय कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाची लयलूट घेऊन येत आहोत.

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत संक्रांत मेळावा
उपक्रम : उपस्थितांसाठी कलर्स कृष्ण भजनाचा विशेष कार्यक्रम
अमरावती : लोकप्रिय कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा सखी मंच सदस्यांसाठी संस्कृती आणि मनोरंजनाची लयलूट घेऊन येत आहोत.
संक्रांत मेळावा: २८ तारखेला बीएसएनएल मागील लेवा भवनात दुपारी ४ ते संध्या. ७ वाजेपर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात आल्या आहे. ज्यात स्त्रियांच्या आवडीची स्पर्धा म्हणजे उखाणे स्पर्धा. (यात केवळ एक उखाणा घ्यावयाचा आहे.)
तीळ व्यंजन स्पर्धा: (गोड किंवा तिखट पैकी कुठलाही एक पदार्थ घरून करुन आणायचा) व संक्रांत सोहळ्याला साजेशी स्पर्धा म्हणजे संक्रांत सखी फॅशन शो (यात काळी साडी व हलव्याचे दागिने घालणे आवश्यक)
कुठल्याही एका स्पर्धेत सदस्यांना भाग घेता येईल सर्व स्पर्धामध्ये मर्यादित जागा असून प्रत्येक स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. अतिशय आकर्षक असे पुरस्कार या स्पर्धांना ठेवले आहे. कलर्स चॅनल म्हणजे स्त्रियांचे मनपसंत चॅनल. नेहमीच संस्कृती जोपासणारे कार्यक्रम कलर्स चॅनलच्यावतीने लोकमत सखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यात संक्रांत मेळावा आणखी एक आकर्षक ठरणार आहे.
पुन्हा एक नवीन विषय नवीन कलाकार घेऊन कलर्स वर नावीन्यपूर्ण मालिका कृष्णदासी रसिकांच्या सेवेत प्रसारित होणार आहे. २५ जानेवारीपासून रात्री १0.३0 वा. कलर्स चॅनलवर देवदासी प्रथेवर आधारित ही मालिका कुमुदिनी तुलसी आणि आराध्या या स्त्री नायिकांमध्ये गुंफण्यात आली आहे.
फार पूर्वीपासून चालत आलेल्या देवदासी प्रथेला आजच्या पिढीच्या नजरेतून मार्मिकपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न कलर्स चॅनलने केला आहे आणि खास याचसाठी कृष्णभजनाचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला आहे. सर्व स्पर्धा, नि:शुल्क असून स्पर्धांची अधिक माहिती व नोंदणीकरिता संपर्क संयोजिका लोकमत सखी मंच कार्यालय, लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती मो़ नं़ 9850304087 / 8956544448 संपर्क करावा.