जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:50 PM2018-12-01T22:50:59+5:302018-12-01T22:51:16+5:30

जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शनिवारी प्र-जिल्हाधिकारी अजय लहाने यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Collector Om Prakash Deshmukh said | जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख रुजू

जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख रुजू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शनिवारी प्र-जिल्हाधिकारी अजय लहाने यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यंदाचे कमी पर्जन्यमान व पेयजल, सिंचन. चारा उपलब्धता आदी स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे देशमुख यांनी सांगीतले. यावेळी जिल्हाधिकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील विविध बाबींची स्थिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार योजनेच्या भरीव अंमलबजावणीसह चारा उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रमासारख्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे, असे ते याप्रसंगी म्हणाले. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. मूळ खात्यात परत आल्याने स्वगृही परतल्याची भावनाही ओमप्रकाश देशमुख यांनी व्यक्त केली.

Web Title: Collector Om Prakash Deshmukh said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.