जिल्हाधिकारी कार्यालय जि.प.प्रसाधनगृहाची दुर्दशा
By Admin | Updated: December 25, 2015 01:07 IST2015-12-25T01:07:37+5:302015-12-25T01:07:37+5:30
ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो, जेथे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना व नागरिकांना नेहमी कामानिमित्त यावे लागतात असे महत्त्वाचे कार्यालय ...

जिल्हाधिकारी कार्यालय जि.प.प्रसाधनगृहाची दुर्दशा
संदीप मानकर अमरावती
ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो, जेथे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना व नागरिकांना नेहमी कामानिमित्त यावे लागतात असे महत्त्वाचे कार्यालय म्हणजे जिल्हाकचेरी व जिल्हा परिषद. परंतु येथील प्रसाधनगृहांची अतिशय दैनावस्था झाली असून याच ठिकाणी कर्मचारीच धूम्रपान करताना आढळत आहे.
गुरुवारी सुटीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय व येथील मिनी मंत्रालय असलेले जिल्हा परिषदमध्ये प्रतिनिधीने फेरफटका मारला असता नझूल व जमावबंदी विभागाजवळील प्रसाधनगृहाची ही स्थिती आढळून आली. येथे नियमित स्वच्छता करण्यात येत नाही. लघु शंकेसाठी जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा किळसवाना प्रकार वाटतो. याचठिकाणी अपंगांकरिता असलेले प्रसाधनगृह मागील अनेक दिवसांपासून बंदास्थेत आहे. त्याला प्रशासनातर्फे टाळे लावले आहे. येथील जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संगणक कक्षाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याची केलेल्या सुविधेजवळ अस्वच्छता आढळून आली. याचठिकाणी शेवाळ वाढली आहे. कर्मचारीच येथे खर्रा खाऊन धूम्रपान करतात. ठिकठिकाणी असा प्रकार निदर्शनास आला आहे. येथील नियंत्रण कक्षाजवळील रॅम्पजवळ दोन्ही बाजूला धूम्रपानाच्या पिचकाऱ्या मारलेले दिसून आले. ज्याठिकाणी जिल्हाधिकारी बसतात, अशा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीच अशाप्रकारे धूम्रपान करीत असतील तर त्यांच्यावर वचक कोणाचे, असा प्रश्न विचारला जात आहे. गुटखाबंदी असताना कायालयात गुटखा येतोच कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण अंबानगरीतील नागरिकांची नजर असते. लोकांसमोर जरी अधिकारी, कर्मचारी गुटखा पुड्या, पान खात नसले तरी लपून छपून सर्रास हा प्रकार येथील परिसरात होताना दिसत आहे. यावर प्रसासनाने नियंत्रण आणणे अतिशय गरजेचे झाले आहे.