शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सर्दी, खोकल्याने अमरावतीकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 21:58 IST

वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या व्हायरल इन्फेक्शनच्या विळख्यात अमरावतीकर सापडले असून, सर्दी व खोकल्याने नागरिक चक्क दमकोस होत असल्याची स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरातील अनेक सदस्य या व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रस्त असून, शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीही वाढली आहे.

ठळक मुद्देव्हायरल इन्फेक्शनचा विळखा : वातावरणातील बदलाने हैराण, कुटुंबातील अनेकांना आजाराचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या व्हायरल इन्फेक्शनच्या विळख्यात अमरावतीकर सापडले असून, सर्दी व खोकल्याने नागरिक चक्क दमकोस होत असल्याची स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरातील अनेक सदस्य या व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रस्त असून, शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीही वाढली आहे.हिवाळा हा स्वास्थ्यवर्धक ऋतू असल्यामुळे बहुतांश आजारांचे प्रमाण कमी असते. तथापि, हिवाळ्याच्या सरतेशेवटी पहाटे व रात्री थंड, तर दिवसभर तीव्र उन्हामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रभाव वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. या व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकला व तापीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. नर्सरी ते महाविद्यालयीन विद्यार्थी असो वा वयस्क किंवा वयोवृद्ध, अशा बहुतांश अमरावतीकरांना व्हायरल इन्फेक्शनचा फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे वातावरणात एडिनो व कोकासाकी व्हायरस सक्रिय झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अशा थंड व गरम वातावरण हवेच्या माध्यमातून हे व्हायरस एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरत आहे. साधारणात सर्दी व खोकल्याचे प्राथमिक लक्षणांनंतर ताप आजारपर्यंत ही लक्षणे दिसतात. या व्हायरल इन्फेक्शनच्या विळख्यात बहुतांश अमरावतीकर अडकले आहेत.आठवड्याभरात २७५ तापाचे रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयात २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान विविध आजारांचे ६ हजार ५६९ रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यापैकी ५०८ जणांना दाखल करून घेतले. सर्दी, खोकला व तापाचे २७५ रुग्ण आढळून आले. याशिवाय टायफॉइडचे ४२ पॉझिटिव्ह दाखल करण्यात आले.चिमुकल्यांवर सर्वाधिक प्रभाववातावरणातील बदलाचा सर्वाधिक प्रभाव पाच वर्षांखालील लहान मुलांवर दिसून येत आहे. शाळा, डे-केअर सेंटर व ग्रीष्मकालीन शिबिरांमध्ये हे विषाणू मोठ्या संख्येत असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील मुले एकमेकांजवळच खेळतात. अशावेळी शिंकताना निघणाºया तुषारांतून हे व्हायरस एकापासून दुसºया मुलांपर्यंत हवेच्या माध्यमातून पोहोचतात. त्यामुळे या सर्दी व खोकल्याचे सर्वाधिक प्रमाण लहान मुलांमध्ये आढळून येते.अशी घ्यावी काळजीथंड व आंबट खाऊ नये. शक्यतो आजारी रुग्णांपासून दूर राहावे. खोकलताना तोंडाला रुमाल बांधावा. वारंवार हात धुण्याची सवय करावी, गर्दीच्या ठिकाणी आजारी व्यक्तीला पाठवू नये. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.फ्लू व्हॅक्सिन हा प्रतिबंधात्मक उपायफ्लूसारखी लक्षणे दिसणाऱ्या आजारांवर प्रतिबंधत्मक उपाय म्हणून व्हॅक्सिनेशन करून घेता येते. लहान मुले व मोठे व्यक्तींनी प्रतिबंधक लस टोचून घेतल्यास वर्षभरापर्यंत आजाराला अटकाव होऊ शकतो. दरवर्षी ही लस घ्यावी लागते. दरवर्षी व्हायरस बदलत असल्यामुळे लससुद्धा बदलत असल्याचे डॉक्टर सांगत आहे. हे लसीकरण केल्यास व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण होण्याची शक्यता असल्याचे मत डॉक्टरांचे आहे.लक्षणेव्हायरल इन्फेक्शनच्या प्रभावाने सर्दी, खोकला, उलट्या, थंडी ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.वातावरणबदलाने निर्माण झालेल्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकल्या व तापाचे रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे थंड आंबट खाऊ नये. शक्यतो आजारी रुग्णांपासून दूर राहावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वारंवार हात धुवावेत आणि व खोकताना रुमालाचा वापर करावा.- ऋषीकेश नागलकरवैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय.