सर्पमित्राला कोब्राचा दंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:55 IST2019-08-12T00:54:33+5:302019-08-12T00:55:21+5:30
सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विचोरीत घडली. भरत डोंगरे (रा. विचोरी) हा सापाला बाटलीत बंद करून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. साप पाहून रुग्णालयात उपस्थितांची भंबेरी उडाली.

सर्पमित्राला कोब्राचा दंश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विचोरीत घडली. भरत डोंगरे (रा. विचोरी) हा सापाला बाटलीत बंद करून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. साप पाहून रुग्णालयात उपस्थितांची भंबेरी उडाली.
विचोरी येथील सचिन हिरडे यांच्या घरातील देवघरात रविवारी कुटुंबीयांना कोब्रा दिसल्यानंतर खळबळ उडाली होती. साप निघाल्याच्या माहितीवरून सर्पमित्र भरत डोंगरे यांनी हिरडे यांचे घर गाठले. भरतने सापाला पकडण्याचे प्रयत्न केले असता,सापाने भरतच्या अंगठ्याला दंश केला. तरीसुद्धा भरतने सापाला पकडून बाटलीत बंद करून रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी सर्पदंशाची जखम पाहून भरत याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. कोब्रा हा विषारी साप असून, त्याचा दंशानंतर योग्य उपचार व्हावा, या उद्देशाने तो सापाला घेऊन आल्याचे भरतने सांगितले.