शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

मेळघाटात ढगफुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 5:00 AM

चिखलदरा/परतवाडा/धारणी : बुधवारी मध्यरात्री मुसळधार बरसलेल्या पावसामुळे मेळघाटच्या धारणी-चिखलदरा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आदिवासी पाड्यांना जोडणारे अनेक ...

ठळक मुद्देनदी-नाले ओसंडून वाहू लागलेपरतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गासह सर्व मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला, सिपना, चंद्रभागा, शहानूर, नद्या-नाल्यांना महापूर

चिखलदरा/परतवाडा/धारणी : बुधवारी मध्यरात्री मुसळधार बरसलेल्या पावसामुळे मेळघाटच्या धारणी-चिखलदरा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आदिवासी पाड्यांना जोडणारे अनेक मार्ग बंद पडले असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गही बंद पडला.

लोकमत चमूलोकमत न्यूज नेटवर्कमेळघाटात बुधवारी मध्यरात्रीपासूनच ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस धो-धो कोसळला. त्याचा फटका आदिवासी पाडे, तालुका मुख्यालय व आंतरराज्य महामार्गाला बसला. गुरुवारी दुपारपर्यंत पूर्णतः वाहतूक ठप्प होती. सेमाडोह येथे सिपना नदीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले. येथील भूतखोरा आणि निसर्ग निर्वाचन संकुलकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद होते. सिपना नदीवरील या दोन्ही पुलांवर नदीच्या पूरस्थितीमुळे पाणी ओसंडून वाहत होते. परतवाडा-धारणी-इंदूर मार्ग बंद होता. सेमाडोह  गावात अनेक झाडे उन्मळून पडल्याने वीज खांबसुद्धा वाकून कोसळले, तार तुटल्या. परिणामी  विद्युत पुरवठा खंडित झाला. दुसरीकडे घटांग ते काटकुंभ-डोमा  मार्गावर कुकरूनजीक दरड कोसळली, तर सलोना ते चिखलदरा मार्गावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. जामूननाला-कामापूर गावानजीक उन्मळून पडलेले झाड सलोना येथील रस्त्याने जाणारे कैलास हरसुले, राजा शेळके, नरेश वाघमारे, राजेश कासदेकर, योगेश शेलके, बबलू झमरकर या युवकांनी कापून बाजूला केले व रेशन धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनासह सिलिंडर व प्रवासी वाहतूक सुरळीत झाली. 

धारणीतील ५० गावे संपर्कविहीनधारणीपासून आठ किलोमीटर अंतरावरील उतावली गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीचे धारणीकडे येणाऱ्या पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला. त्यामुळे हरदोली, पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, पाटिया आठनादा, तर दिया या गावाजवळील पुलावर सिपना नदीला पूर आल्यामुळे धारणामहू, केकदा, चटवाबोड, भोंडीलावा, काटकुंभ, बुलम, बैरागड, कुटांगा, सावलखेडा, रंगुबेली या गावांसह अन्य गावांना धारणी मुख्यालयापासून तोडले. अमरावती,  नागपूर व मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर व इंदूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर