आजपासून बाजार समितीमधील शेतमाल खरेदी बंद
By Admin | Updated: December 21, 2014 22:49 IST2014-12-21T22:49:47+5:302014-12-21T22:49:47+5:30
शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार

आजपासून बाजार समितीमधील शेतमाल खरेदी बंद
अमरावती: शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार २२ नोव्हेंबरपासून धान्यखरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. याविषयी बाजार समिती प्रशासक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल, असे आडते अमर बांबल यांनी सांगितले. शेतीमाल ठेवणे, तो विकणे,दर मिळवून देण्याचे काम आडते करतात. शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याच्या बदल्यात आडत घेतला जातो. आडत खरेदीदाराकडून घेतल्याने परिणाम होईल.
शासनाने फेरविचार करावा
खरेदी आडत्यांची रक्कम शेतमालाचे दर कमी करून वसूल करण्याची शक्यता असल्याने या निर्णयाचा भुर्दंड सर्वसामान्याला बसणार असल्याचे मत बाजार समितीमधील व्यापारी, आडते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अन्य राज्यातले व्यापारी येथे येऊन शेतमाल खरेदी करणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार आडत्यांवर अन्याय होत असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र या निर्णयामुळे काहीअंशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे. (प्रतिनिधी)