शासकीय विद्यानिकेतनमध्ये लिपिकाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:57+5:302021-08-27T04:17:57+5:30
अमरावती : स्थानिक वलगाव रोडस्थित शासकीय विद्यानिकेतन शाळेत कार्यरत लिपिकाने शाळेच्या प्रार्थनागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ९.३० ...

शासकीय विद्यानिकेतनमध्ये लिपिकाने घेतला गळफास
अमरावती : स्थानिक वलगाव रोडस्थित शासकीय विद्यानिकेतन शाळेत कार्यरत लिपिकाने शाळेच्या प्रार्थनागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना उघड झाली. दिनेश चामटाले असे मृत लिपिकाचे नाव आहे.
शासकीय विद्यानिकेतन ही पाचवी ते दहावीपर्यंतची निवासी शाळा आहे. चामटाले हे गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास शाळेत दाखल झाले. तेथील महिला कर्मचारी शाळेची नियमित स्वच्छता करीत असताना चामटाले हे प्रार्थनागृहात शिरले. तेथे त्यांनी पंख्याला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती महिला साफसफाईसाठी प्रार्थनास्थळी गेली असता, ही घटना उघड झाली. लगेचच नागपुरी गेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
सुसाईड नोट मिळाली
घटनास्थळाहून मृताच्या खिशातून सुसाईड नोट जप्त करण्यात आली. शाळा मुख्याध्यापकाच्या त्रासापोटी आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद असल्याची माहिती आहे. दिनेश चामटाले हे २८ जुलैपासून शाळेत गैरहजर होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापकाकडून देण्यात आली.