कोंडेश्वर तलाव स्थळी स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:41+5:302021-09-22T04:14:41+5:30
बडनेरा : शहर तसेच ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन कोंडेश्वर तलावात करण्यात आले. जलाशयात मोठ्या प्रमाणात ...

कोंडेश्वर तलाव स्थळी स्वच्छता मोहीम
बडनेरा : शहर तसेच ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन कोंडेश्वर तलावात करण्यात आले. जलाशयात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा झाले होते. प्राण्यांचे पुनर्वसन व संवर्धन संस्थेमार्फत या परिसराची स्वच्छता करून पर्यावरणपूरक मोहीम राबविण्यात आली.
कोंडेश्वर तलावात तसेच काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकण्यात आले होते. पर्यावरणाचे संवर्धन जपण्याच्या हेतूने प्राण्यांचे पुनर्वसन व संवर्धन संस्थेमार्फत तलाव परिसरातील निर्माल्य, प्लास्टिक इतर केरकचरा उचलण्यात आला. या कार्यात राम कोशे, आशिष तिरमारे, सचिन नेवारे, कुंदन ठाकूर, अभय चामाट, अमित मोरे, अजिंक्य जिरापुरे, साहिल शिरसे, रोहित पिसे, गोपाल बारस्कर, अभय काळे, वैभव बांडाबुचे, आकाश गायधने, सोनाली सदावर्ते, चेतन सदावर्ते, दीक्षा डेंबरे, दीप चव्हाण, आशिष मोझरकर आदींनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे तलाव परिसर स्वच्छ झाला.