व्हिडिओ कॉन्फरन्सवर बीडीओंचा वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:09+5:302021-05-12T04:14:09+5:30

अमरावती : जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचा विविध विषयनिहाय विस्तृत आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्हिडिओ ...

Class of BDs on video conferencing | व्हिडिओ कॉन्फरन्सवर बीडीओंचा वर्ग

व्हिडिओ कॉन्फरन्सवर बीडीओंचा वर्ग

अमरावती : जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचा विविध विषयनिहाय विस्तृत आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू केला आहे. मंगळवारी चिखलदरा पंचायत समितीचा आढावा गटविकास अधिकारी (बीडीओ) कडून घेतला आहे. याशिवाय अन्य पंचायत समितीचाही प्रत्येक दिवशी आढावा घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदभार स्वीकारताच प्रत्येक तालुक्याचा विस्तृत आढावासोबतच संबंधित तालुक्याची माहिती तसेच जिल्हा परिषद व शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, विकास कामे याबाबत काय स्थिती आहे, याचा लेखाजोखा जाणून घेतला जात आहे. यात प्रामुख्याने महाआवास योजना, पाणीटंचाई, नरेगा अंतर्गत कामांचा आढावा, जलजीवन मिशन, कुपोषण, बालमृत्यूबाबत आढावा, खरीप पेरणीबाबत आढावा, तालुक्यातील बांधकामविषयक कामे, कोविड १९ अंतर्गत तालुकानिहाय स्थिती व उपाययोजना आदी विषयांबाबत मुख्य कार्यकारी अधिकार पंचायत समितीनिहाय आढावा घेत आहेत. यावेळी संबंधित गटविकास अधिकारी यांना महत्त्वाच्या सूचनाही सीईओकडून केल्या जात आहेत.

Web Title: Class of BDs on video conferencing