शहरात ‘स्मार्ट सूनबाई’ची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:32 IST2019-04-02T22:31:57+5:302019-04-02T22:32:18+5:30
दसरा मैदानावर महिला मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या महिलांना आदेश बांदेकरांच्या ‘स्मार्ट सूनबाई’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाने खळखळून हसविले. याप्रसंगी घेतलेल्या रंगारंग स्पर्धा आणि अनोख्या कार्यक्रमांना जमलेल्या हजारो महिलांनी भरभरून दाद दिली

शहरात ‘स्मार्ट सूनबाई’ची धमाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दसरा मैदानावर महिला मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या महिलांना आदेश बांदेकरांच्या ‘स्मार्ट सूनबाई’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाने खळखळून हसविले. याप्रसंगी घेतलेल्या रंगारंग स्पर्धा आणि अनोख्या कार्यक्रमांना जमलेल्या हजारो महिलांनी भरभरून दाद दिली
मुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्यातील घराघरांत पोहोचलेले लाडके मराठी अभिनेते आदेश बांदेकर व शिवसेना - भाजप युतीचे अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अमरावती-बडनेरा शहरातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होत्या. यावेळी आदेश बांदेकर यांनी ‘स्मार्ट सूनबार्इ$ं’ना स्टेजवर बोलावून त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे, यावेळी सर्वच महिलांनी त्यात सहभाग दर्शविला तसेच आपले मनोगतदेखील सदर केले. यावेळी भगव्या फेट्यांमध्ये जमलेल्या महिलांमुळे दसरा मैदानावरील वातावरणदेखील भगवामय झाले होते.
मेळाव्याला पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे, शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.