‘राणा लँन्डमार्क’च्या विरोधात नागरिकांची पोलिसात धाव
By Admin | Updated: August 17, 2014 22:54 IST2014-08-17T22:54:04+5:302014-08-17T22:54:04+5:30
राणा लॅन्ड मार्क प्रा.लि. कंपनीने फसवणूष केल्याचा आरोप करीत रविवारी अनेक नागरिक राणा लॅन्ड मार्कच्या विरोधात निवेदन देण्यासाठी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी यासंदर्भात लेखी

‘राणा लँन्डमार्क’च्या विरोधात नागरिकांची पोलिसात धाव
बेमुदत उपोषणाचा इशारा : पोलीस निरीक्षकांंना निवेदन
अमरावती : राणा लॅन्ड मार्क प्रा.लि. कंपनीने फसवणूष केल्याचा आरोप करीत रविवारी अनेक नागरिक राणा लॅन्ड मार्कच्या विरोधात निवेदन देण्यासाठी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी यासंदर्भात लेखी निवेदन पोलीस निरीक्षकांना देऊन राणा यांच्याकडून पैसे परत न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला.
राणा लॅन्ड मार्कचे संचालक चंद्रशेखर राणा, योगेश राणा (रा. लक्ष्मीनारायण निवास, कॅम्प) यांनी प्लॅट देण्याच्या नावावर हजारो नागरिकांकडून रक्कम घेतली. परंतु त्यांनी फ्लॅट न देता घेतलेली रक्कमही परत केली नसल्याचा आरोप करीत रविवारी अनेक नागरीक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांनी यासंदर्भात लेखी निवेदन पोलीस निरीक्षक रीयाजोद्दीन देशमुख यांना दिले.
राणा यांच्याकडून पैसे परत मिळण्यासाठी नागरीकांनी सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पैसे परत न मिळाल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कींवा चंद्रशेकर राणा यांच्या घरासमोर आमरम उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी विठ्ठल साबळे, राहुल ठोसर, पांडुरंग माकोडे, ए.आर. नघाटे, मिलिंद बेगलवार, अक्षय कडु, चैतन्य कडू, नीलेश बारबुद्दे, शैलेंद्र इंगळे यांच्यासह आदी उपस्थित होते.