देह व्यापाराविरोधात नागरिकांचा एल्गार
By Admin | Updated: December 24, 2015 00:23 IST2015-12-24T00:23:04+5:302015-12-24T00:23:04+5:30
अंबाविहारात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध बुधवारी नागरिकांनी एल्गार पुकारला. शेकडो महिलां-पुरुषांनी पोलीस आयुक्तावर मोर्चा नेऊन व्यक्तीवर कारवाईची मागणी केली.

देह व्यापाराविरोधात नागरिकांचा एल्गार
पोलीस आयुक्तालयावर मोर्चा : अंबा विहारातील महिलेच्या घराची तोडफोड
अमरावती : अंबाविहारात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध बुधवारी नागरिकांनी एल्गार पुकारला. शेकडो महिलां-पुरुषांनी पोलीस आयुक्तावर मोर्चा नेऊन व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर नागरिकांनी त्या महिलेच्या घराची तोडफोड केली.
राजापेठ ठाण्यांतर्गत अंबाविहार परिसरातील रहिवासी एक महिला १५ वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. यामुळे त्या महिलेच्या घरी दररोज विविध वाहनांतून अनेकजण येतात व सर्रार अश्लील चाळे करतात, असा आरोप नागरिकांचा आहे. देहव्यापार चालू असल्याच्या माहितीवरून अनेकदा पोलिसांनी त्या महिलेच्या घरी धाड टाकली. मात्र, यावर अंकुश लागले नसल्याचे मत अंबाविहारवासियांचे आहे. त्यामुळे बुधवारी अंबा विहारातील शेकडो महिला-पुरुषांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला. तेथे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी नागरिकांनी चर्चा करून त्या महिलेवर कारवाईची मागणी केली. त्यांनीही योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नागरिकांनी दिले. त्यानंतर काही नागरिकांनी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनाही निवेदन सोपवून त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्तांनी राजापेठ पोलीस ठाण्यात अधिकाअधिक महिलांनी तक्रार नोंदवावी, असा सल्ला दिला. या मोर्चात राजा बांगडे, राहुल बठाले, सुभाष मारोडकर, दिनकर काटोले, विजय तोड, ज्ञानेश्वर पातसे, यशवंत मोहरे, शरद कांडलकर, एस. एस. बेले, राम वानखडे, वी. कनेरकर, गजानन अनासाने, प्रीतम तांबट, सुरेश निंगोट, अमोल सिरसकर, ओमप्रकाश शर्मा, सुनील निखार, प्रवीण इचे, महादेव वाघमारे आदींची उपस्थिती होती.
अंबाविहारात देह व्यापार सुरू असल्याची तक्रार काही महिला व पुरुषांनी केली आहे. मात्र, सद्यस्थितीत तेथे ती महिला राहत नाही. त्या महिलेचा शोध घेऊन कारवाई करू.
- एस.एस.भगत, पोलीस निरीक्षक. राजापेठ पोलीस ठाणे.