चॉकलेटी घातक मेनाच्या कोटिंगचे सफरचंद विक्रीला
By Admin | Updated: May 1, 2016 00:04 IST2016-05-01T00:04:21+5:302016-05-01T00:04:21+5:30
जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे.

चॉकलेटी घातक मेनाच्या कोटिंगचे सफरचंद विक्रीला
फळांद्वारे मृत्यूची विक्री : आकर्षणासाठी व्हॅक्सचा वापर
संदीप मानकर अमरावती
जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे. चवदार टरबूजातही लाल रंगाचे रासायनिक पदार्थ इंंजेक्शनने टाकून लोकांच्या जीविताशी रोज खेळ खेळल्या जात आहे. आरोग्याला पोषक असलेल्या सफरचंदमध्येही सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चॉकलेटी मेनाचा कोटींग करून सफरचंदाद्वारा घराघरांत विष पोेहोचविण्याचा प्रकार फळविक्रेते करीत आहेत.
विशेषत: या सफरचंदाला बाजारात मोठी मागणी असून हे फळ दोनशे ते तिनशे रुपये किलोने विकले जात आहे. लालसर काळे रंगाचे सफरचंद जादा दिवस टिकावे, ते खराब होऊ नये, यासाठी या ठिकाणाहून सफरचंदचा स्टॉक अमरावतीत येतो. तेथूनच चॉकलेटी रंगाचा मेनाचा सफरचंदवर कोटींग केले जाते. मात्र नागरिकांना कल्पनाही नसेल, अशा प्रकारे आरोग्याला अत्यंत हानीकारक असलेले हे सफरंदला लावलेले मेन अनेक आजार बळावतात. अमरावती शहरात येथील बाजार समितीत २५ ते ३० ठोक फळविक्रेते आहेत. शहराला फळांचा पुरवठा होतो. शनिवारी बाजार समितीत १० क्विंटलएवढी सफरचंदची आवक झाली आहे. यासफरचंदला सात ते पंधरा हजार एवढा क्विंटल मागे भाव मिळाला आहे. बाजारात अनेक प्रकारचे सफरचंद विक्रीस असून हे सफरचंद टवटवीत दिसण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल फळविक्रेते लढवितात. यामध्ये फळांवर खाजगी दुकानातून आणलेले स्टिकर लावून ते फळ कुठल्याही दर्जाचे असले तरी यूएसए व इतर देशातून ही फळे आली असल्याचे त्या स्टिकरवर नमूद असते. नंतर सुरू होते ग्राहकांची लूट. फळे बेभाव विकून नागरिकांच्या जिवीताशीही खेळ खेळला जात आहे. यामध्ये बेस्ट क्वालिटी गार्डन फ्रुट, रोसेला , रेड चिप ४०१५ चिलन फ्रेस रेड बेलन्स यूएसए झेनाई, वोहींग फ्रेस फ्रुट असे विविध स्टिकर लावून ही फळे विकली जात आहे. मात्र फळांचा ट्रक आल्यानंतर या प्रजातींची फळे ठोक मध्ये जेव्हा माल येतो. तेव्हा लावली जातात की जेव्हा सफरचंद अमरावतीला आल्यानंतर लावली जातात याबदल प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घातक सफरचंदाचे नमून घेतल्यास सत्य उघड होईल.
काश्मीरमधून येतात सफरचंद
काश्मीरातून सफरचंद येते. मात्र फळे विक्रेते स्थानिक पातळीवर स्टिकर लावून ते फळी विदेशातून आल्याचे सांगण्यात येते. दीर्घकाळ टिकावा म्हणून सफरचंदवर चॉकलेटी व्हॅक्स लावले जाते. रसायनिक प्रक्रियेतून तयार केलेले मेन आरोग्याला हानीकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आरोग्याला पोषक असलेली फळे घातक
सफरचंद मध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असल्यामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. परंतु कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या चॉकलेटी मेनाचा वापर करून ही फळे चमकवितात. त्यामुळे कर्करोगासारखे आजार रोज विकला जात आहे.
सफरचंदमध्ये 'क' जीवनसत्व
सफरचंदमध्ये 'क' जीवनसत्व असते. तसेच त्यामध्ये डी कॉम्प्लेस ग्रुप असते. हे आहारात घेतल्याने आयर्न (लोह) मिळते. यामुळे शरीरात रक्तवाढीस मदत होते, असे डॉक्टरांचे मत आहे. जर फळे खायची असेल तर गरम पाण्याने वरील लेप धुऊन, पुसून काढावे. नंतरच ती फळे खावी.
हे आजार उदभवतात
नियमित व्हॅक्स (मेन) लावलेली सफरचंद खाण्यात आल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. पोट दुखणे, लाहन मुलांची वाढ खुंटने व काही कालावधीनंतर कर्करोगही होण्याची संभावना असते, असे हद्य रोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी सांगितले.