अमरावती : शहरातील दस्तुरनगर येथे संपर्क अभियान भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा शिल्पा चौधरी-पाचघरे यांच्या मार्गदर्शनात तान्हा पोळा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते. भाजप राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान अंतर्गत सहभागी सर्वांच्या घरी जाऊन कोरोनाकाळात आपले मानसिक व सामाजिक स्वास्थ कसे जपले पहिजे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिल्पा चौधरी-पाचघरे यांनी तीन दिवस हे अभियान राबविले. सियाना विक्की मेहता, बग्गा परिवार, पाटील , बर्गी, पवार, सोनार, काळे, धुंडीयाल, राऊत, अंधारे, पुरुषे, ठाकरे, पाटील, मेंढी अशा अनेक कुटुंबांना प्रत्यक्ष भेट दिली. मास्क, सॅनिटायझर वापर, वारंवार हात धुणे, घरातील सर्वांचे लसीकरण तसेच कोविड काळात कसे लढायचे, मानसिक, शारीरिक व सामाजिक स्वास्थ जपायला कसे जपायला हवे, राष्ट्रीय पोषण, इंद्रधनुष्य मिशन, लसीकरण याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. अविनाश काळे, डॉ. उज्वला काळे, सृष्टी सोनार यांनी सहकार्य केले. नीता अजमिरे, संध्या देशमुख, पल्लवी बर्गी, सुवर्णा देशमुख, मयूरी धुंडियाल, मुकुंद बर्गी, माणिकराव पाचघरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दस्तुरनगर येथे चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:17 IST