शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

आईच्या डोळ्यांदेखत मुले बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:00 AM

पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना अव्हेरून काही जण नदीपात्रात उतरले. ऋषीकेशला वाचविण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. ते वाहून जात असताना यशने हंबरडा फोडला. मात्र, नदीच्या रूद्रावतारापुढे कुणाला काहीच करता आले नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । दु:खाचा डोंगर; नि:शब्द झाले गौरखेडा

सचिन मानकर/धीरज राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर/खल्लार : वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीच्या पुलाजवळील घाटावर गुरुवारी गौरखेड्याचे चार जण वाहून गेले. पैकी तिघांचे मृतदेह मिळाले. सतीश सोळंकेचा अद्यापही पत्ता लागला नाही वा त्याचा मृतदेह मिळाला नाही. घटनेतील मृत संतोष वानखडेवर शुक्रवारी सायंकाळी, सागर शेंदूरकरवर शनिवारी दुपारी, तर ऋषीकेश वानखडे याच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.शुक्लेश्वर घाटावर गणेश विसर्जनासाठी पोहोचलेल्या ऋषीकेश वानखडे व सतीश सोळंके यांच्यासह दोघांच्या आई सोबत होत्या. पोटची मुले डोळ्यांदेखत नदीत वाहून जाण्याचा वेदनादायी प्रसंग या माउलींनी अनुभवला. संतोष वानखडे यांचा मुलगा व मुलगीही शुक्लेश्वर घाटस्थळी उपस्थित होते. पिता वाहून जात असल्याचे पाहून तेही कोलमडले.गौरखेडा येथील वीर शिवाजी तरुण उत्साही सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता अनेक तरुण गुरुवारी ३ वाजता निघाले. आधी खल्लार येथील चंद्रभागा नदीच्या पुलाजवळ गणेश विसर्जन करण्याचे ठरले. मात्र, पॉवर हाऊसजवळ आले असताना काही कार्यकर्त्यांनी वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात गणेशमूर्ती विसर्जन करू, असे म्हटल्याने ट्रॅक्टर शुक्लेश्वर घाटाकडे वळविण्यात आला. ऋषीकेश व सतीश या दोघांच्या आई ट्रॅक्टरमध्ये होत्या. मृत संतोष वानखडे यांचा सातव्या वर्गात शिकणारा मुलगा यश व त्याची बहीण रोहिणी हेसुद्धा ट्रॅक्टरमध्ये होते. कार्यकर्ते गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना संतोष वानखडे हे घरी होते. त्यांची विसर्जनाला जाण्याची इच्छा नव्हती; परंतु मुलांच्या काळजीने ते गेले. पुलावरून विसर्जन करायचे की घाटावरून, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता नव्हती. पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना अव्हेरून काही जण नदीपात्रात उतरले. ऋषीकेशला वाचविण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. ते वाहून जात असताना यशने हंबरडा फोडला. मात्र, नदीच्या रूद्रावतारापुढे कुणाला काहीच करता आले नाही.संतोष, सागर, ऋषीकेशला शेवटचा निरोपजिल्हा शोध व बचाव पथकाने संतोष वानखडे यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी शोधला. दुपारी शवविच्छेदनानंतर उशिरा सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागरच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबासह संपूर्ण गाव नि:शब्द झाले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी गावात धाव घेतली.सतीशच्या आईवर तीन दिवसांपासून उपचारसतीश सोळंके याचा मृतदेह अद्यापही बचाव पथकाच्या हाती लागलेला नाही. डोळ्यांदेखत मुलगा पूर्णा नदीपात्रात वाहून गेल्याने त्याच्या आईला जबर धक्का बसला. तीन दिवसांपासून त्यांना सलाइन लागले आहे. राहत्या घरी त्यांच्यावर उपचार होत आहेत.गहिवरले बालपणीचे मित्रसागर शेंदूरकर याच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या मित्रमंडळींनी गौरखेड्यात धाव घेतली. यावेळी सागरसोबत पाचव्या वर्गात खल्लार येथे शिकणारा मित्र प्रतीक खंडारे व अन्य मित्रांना अश्रू आवरता आले नाहीत. बालपणाचा सखा जग सोडून गेल्याने ते गहिवरले. सागरला हवाई दलात जाण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी तो तयारी करीत होता. मात्र, त्याचे स्वप्न अधुरे राहिले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनDeathमृत्यू