शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना भेटण्यापूर्वीच आईचा मृत्यूू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:10 IST

अचलपूर तालुक्यातील ग्राम वझ्झर येथून दर्यापूरच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांची भेट घेण्याची आईची इच्छा अधुरी राहिली. जवळापूर फाट्यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुचाकीला अपघात : जवळापूर फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : अचलपूर तालुक्यातील ग्राम वझ्झर येथून दर्यापूरच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांची भेट घेण्याची आईची इच्छा अधुरी राहिली. जवळापूर फाट्यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.वैजयंती सुखराम बेठे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. पती सुखराम मणिराम बेठे (३५) तिच्यासह दोन वर्षीय मुलाला घेऊन दुचाकीने दर्यापूर येथे शिकणारे सूरज (१४) व सोनाली (१२) या अपत्यांना भेटण्यासाठी १५ आॅगस्टला निघाला. त्याच्या एमएच २७ एवाय ६५०२ क्रमांकाच्या दुचाकीला पहाटे साडेपाच वाजता अंजनगाव सुर्जीहून परतवाड्याकडे जाणाºया अज्ञात ट्रकने जवळापूर फाट्यानजीक कृष्ण मंदिराजवळ धडक दिली. यात वैजयंतीचा जागीच मृत्यू झाला, तर सुखराम व दोन वर्षाचा मुलगा सुखरूप बचावले.झेंडावंदनाची तयारी करीत असलेले पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार सतीश आडे, एएसआय सुभाष फुंदे, सुनील पवार, प्रमोद चौधरी, बुरनासे, प्रकाश जाधव, राजाराम मेहश्रे, चालक बाळू धुर्वे यांनी पंचनामा करून मृतदेह अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविला.मुलांनी फोडला हंबरडापथ्रोट पोलिसांकडून अपघाताबाबत दर्यापूर येथे शिकत असलेल्या सूरज व सोनालीला कळविण्यात आली. आश्रमशाळा प्रशासनाने त्यांना घटनास्थळी रवाना केले. आईचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. दुसरीकडे सुखराम व त्याच्याकडे असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याची स्थितीदेखील दयनीय होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू