शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
10
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
11
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
12
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
15
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
16
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
17
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
18
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
19
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
20
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात चिकुनगुनियाचा कहर ; नऊ महिन्यांत २८२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 20:16 IST

Amravati : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्क्रब टायफसचेदेखील दोन रुग्ण आढळल्याची माहिती यंत्रणेने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या आजाराचे प्रमाण वाढले असून, जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान चिकुनगुनियाचे तब्बल २८२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्यादेखील ३१० इतकी पोहोचली आहे; परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे जिल्हा हिवताप विभागाचे म्हणणे आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कीटकजन्य आजारांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. यात आरोग्य विभागाकडून फॉगिंग, लार्वानाशक फवारणी, साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविण्यात येते. तसेच नागरिकांनी घराच्या परिसरात साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे, कुलर, फुलदाणी, टाक्या, बादल्या यामध्ये डासांची पैदास होऊ नये, यासंदर्भात जनजागृती केली जाते; परंतु तरीही यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 

नऊ महिन्यांत २८२ रुग्ण

जिल्ह्यात नऊ महिन्यांत तब्बल २८२ रुग्ण आढळले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात ६३ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २१९ रुग्ण आढळले. त्याचबरोबर डेंग्यूच्या ३१० रुग्णांपैकी २२९ हे ग्रामीण भागात तर मनपा क्षेत्रातील ८१ रुग्ण आहेत.

वेळीच घ्या काळजी

चिकुनगुनिया व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये उच्च ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न घेतल्यास रक्तपेशींची संख्या घटू शकते आणि रुग्ण गंभीर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच रुग्णालयात जाणे गरजेचे आहे.

मलेरियाचे रुग्ण वाढले

चिकुनगुनिया, डेंग्यू आजारांबरोबरच यंदा मलेरियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत १३६ मलेरियाचे रुग्ण आढळले. यामध्ये ग्रामीण भागात १२६ आणि शहरात १० रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये मुंबईतून परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

"नऊ महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यूचे ३१० रुग्ण असले, तरी गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या यंदा घटली आहे. परंतु, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, ती २८२ इतकी झाली आहे. कीटकजन्य आजार रोखण्यासाठी हिवताप विभागाकडून सर्व प्रयत्न केले जातात."- डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Chikungunya Outbreak in Amravati: 282 Cases in Nine Months

Web Summary : Amravati district faces a Chikungunya surge, with 282 cases reported in nine months. Dengue cases are 310, lower than last year. Increased malaria cases are also noted, especially among those returning from Mumbai. Health officials urge precautions and prompt treatment.
टॅग्स :dengueडेंग्यूAmravatiअमरावतीHealthआरोग्य