मुख्याधिकाऱ्यांनी केली पाच दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST2021-04-09T04:14:11+5:302021-04-09T04:14:11+5:30

परतवाडा : लॉकडॉऊनचे नियम न पाळणाऱ्या शहरातील पाच दुकानांना अचलपूर नगरपालिकेच्या पथकाने सील केले. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी ...

The chief minister sealed five shops | मुख्याधिकाऱ्यांनी केली पाच दुकाने सील

मुख्याधिकाऱ्यांनी केली पाच दुकाने सील

परतवाडा : लॉकडॉऊनचे नियम न पाळणाऱ्या शहरातील पाच दुकानांना अचलपूर नगरपालिकेच्या पथकाने सील केले. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी गुरुवारी शहरात फिरून ही कारवाई केली.

मुख्याधिकारी गीता ठाकरे, कार्यालयीन अधीक्षक दहीकर, कुंजीलाल मिश्रा, अखिलेश मिश्रा यांनी गुजरी बाजार येथील हेमनानी इलेक्ट्रॉनिक्स, जीएम मार्केटमधील निक रेडिमेड, पालिका समोरील सारथी कलेक्शन, आठवडी बाजार जावेद सायकल स्टोअर्स व अचलपूर येथील दत्त साई अशा पाच दुकानांवर कारवाई के ली. राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी येथील व्यापारी प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

-----

Web Title: The chief minister sealed five shops