शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

छत्री तलाव आजही भागवतोय उमरावतीची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:24 IST

दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पाणीच संजीवनी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पाणीच संजीवनी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.अमरावती शहरालगतच्या छत्री तलावाची निर्मिती सन १८८८ साली झाली. दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावेळी २ लाख ३६ हजार रुपये खर्चून इंग्रजांनी हा तलाव तयार केला होता. पूर्वीच्या उमरावती शहरातील लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी छत्री तलाव सक्षम होता. तलावाचे पाणी शहराला पुरविता यावे, या उद्देशाने १८९०-९१ मध्ये मोठी पाइप लाइन टाकण्यात आली होती. छत्री तलावापासून ती पाइप लाइन राजापेठ व अंबापेठपर्यंत गेल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. त्यावेळी याच पाईप लाईनवर नळ बसविण्यात आले होते. विविध परिसरातून जाणाºया या पाइप लाइनवरील नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आजही या नळातून पाणीपुरवठा केला जात असून, छत्री तलावालगतच्या परिसरातील नागरिक पाण्याचा उपयोग करीत आहेत. याशिवाय या तलावाची पाण्यामुळे जेवडनगर, फर्शी स्टॉप, कलोतीनगर, दस्तुरनगर, बेनोडा आदी परिसरातील जलपातळी राखण्यास मोठी मदत मिळाली आहे. भविष्यात जलसंकट गडद झाल्यास या तलावाचा उपयोग होणार आहे.शुद्धीकरण केंद्र सुरू करावेछत्री तलावातील पाण्याचा वापर आजही होत आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणी मिळत आहे. आगामी संकटकाळात छत्री तलाव उपयोगी पडेल. तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून पाइप लाइन व सयंत्राचे नूतनीकरण केल्यास शहरातील काही परिसरात पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती स्थानिक रहिवासी नीलेश कंचनपुरे यांनी दिली.पाण्याची पातळी वाढविण्यास मदतछत्री तलावातील पाणी पंचवीस हजार लोकसंख्येला पुरेल, या अंदाजाने तो बनविण्यात आला. दररोज पाच लाख गॅलन पाणी शहरास देता देईल, असा अंदाज होता. तलाव पूर्ण भरल्यास, त्यात सव्वा तीन लाख गॅलन इतक्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होतो; दीड वर्ष पाणी पुरेल, असा अंदाज होता. याशिवाय तलाव भरण्यासाठी एकावेळी सतत चोवीस तास सात ते नऊ इंचापर्यंत पाऊस पडणे अपेक्षित होते. तरीदेखील त्यावेळी या तलावाने नागरिकांना बराच दिलासा दिला. आजही छत्री तलावातील पाण्याने आजूबाजूच्या परिसरातील पातळी राखून ठेवली आहे.छत्री तलावाचा इतिहाससन १८८८ साली उमरावती नावाने ओळखल्या जाणाºया अमरावती शहरास पूर्वी विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. कालांतराने ब्रिटिशांनी तलाव तयार केल्यानंतर त्या पाण्याचा वापर सुरू झाला. पूर्वी कालापानी तलाव नावाने ओळखल्या जाणाºया या तलावावर छत्री बांधण्यात आली. तेव्हापासून छत्री तलाव नावारूपास आले. शहराच्या पूर्वकडील टेकड्यांचा आश्रय घेऊन व तेथून वाहणाºया नाल्याचे पाण्याचा प्रवाह तलावाच्या पोटात राहील, अशा रीतीने हा तलाव बांधण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी मातीचा भराव टाकून पाळ बांधण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी मोठा पाइप पाळेच्या खालून बाहेर काढलेला आहे. तेथेच छत्री बांधण्यात आली. या छत्रीखालीच पाणी सोडण्याच्या चाव्या आहेत. तलावाच्या तळापासून १५ फुट उंचावर पाइप आहे. पंधरा फुटांपेक्षा अधिक पाणी तलावात असेल, तर शहराला पाणीपुरवठा होत होता.

टॅग्स :Waterपाणी