चेकपोस्टवर वाहतूक पोलिसाला उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:34+5:30

पोलीस सूत्रानुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर आचारसंहिता तपासणी नाका उभारण्यात आला आहे येथे वर्धा जिल्हातून अमरावती जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यानुसार नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एमएच ३० एझेड २३२२ या चारचाकी वाहनाला तपासणीसाठी पोलिसांनी थांबविले.

At the checkpost, traffic was flown to the police | चेकपोस्टवर वाहतूक पोलिसाला उडवले

चेकपोस्टवर वाहतूक पोलिसाला उडवले

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करताना वाहतूक पोलिसाला जिवे मारण्याच्या उद्देशाने एका चारचाकी वाहनाने जखमी करून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिवसा पोलिसांनी पळ काढणाऱ्या वाहन चालकाला पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे
पोलीस सूत्रानुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर आचारसंहिता तपासणी नाका उभारण्यात आला आहे येथे वर्धा जिल्हातून अमरावती जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यानुसार नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एमएच ३० एझेड २३२२ या चारचाकी वाहनाला तपासणीसाठी पोलिसांनी थांबविले. मात्र वाहनचालकाने पोलिसांशी वाद घालत थेट कर्तव्यावर असलेल्या सतीश अशोकराव चंदन (४४) या वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सुदैवाने बचावले. या घटनेत वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वाहनचालक विजय विश्वनाथ देवके (४४, रा.अकोला) याला तिवसा पोलिसांनी अटक करून त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे
नाकाबंदी करून पकडले वाहनचालकाला
घटनास्थळावरून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन चारचाकी वाहन चालकाने पळ काढला होता. मात्र, तिवसा पोलिसांनी तातडीने पेट्रोल पंप चौकात नाकाबंदी करून वाहनासह चालकाला अटक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती.

Web Title: At the checkpost, traffic was flown to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.