‘ऑनलाईन अॅप’वर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:36+5:30
अभिजित ठवरे यांनी ६ जूून २०१९ रोजी ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अॅपवर टिनपत्र्यांची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित कलायतीस स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेडचा संचालक अशी बतावणी करून आरोपी सुमितकुमार डे (रा. महराजा नंदकुमार रोड, आरामबाजार, कोलकत्ता) याने अभिजित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यासाठी अभिजित यांनी आरोपीच्या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात १० लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश जमा केला.

‘ऑनलाईन अॅप’वर फसवणूक
कॉमर्स अॅपवर १० लाखांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अॅपवर ऑनलाईन नोंदणी व रकमेचा भरणा करूनही मालाची डिलिव्हरी न करता फसवणूक करण्यात आली. ९ लाख ६० हजार रुपयांच्या या फसवणूक प्रकरणात धारणी पोलिसांनी कलकत्याच्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. येथील तलई कॅम्प भागातील अभिजित अरूण ठवरे असे गंडविले गेलेल्या ग्राहकाचे नाव आहे.
अभिजित ठवरे यांनी ६ जूून २०१९ रोजी ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अॅपवर टिनपत्र्यांची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित कलायतीस स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेडचा संचालक अशी बतावणी करून आरोपी सुमितकुमार डे (रा. महराजा नंदकुमार रोड, आरामबाजार, कोलकत्ता) याने अभिजित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यासाठी अभिजित यांनी आरोपीच्या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात १० लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश जमा केला. संपूर्ण रक्कम पाठवूनदेखील आरोपीने टिनपत्र्यांची डिलिव्हरी केली नाही. त्यामुळे अभिजित यांनी आरोपीसोबत संपर्क साधून टिनपत्रे पाठविण्याची किंवा रक्कम परत करण्याची मागणी केली.
आरोपीने १०.६७ लाखांपैकी १ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम सहा महिने होऊनही परत केली नाही. त्यामुळे अभिजित ठवरे यांनी ४ जानेवारी रोजी धारणी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, आयटी अॅक्टच्या कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.