शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टावर चॅट झाली, तिघांनी थेट शरीरसुखाची मागणी केली!

By प्रदीप भाकरे | Updated: November 25, 2023 13:56 IST

 ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हे, पीडिता अल्पवयीन

अमरावती : एका १७ वर्षीय मुलीला इन्स्टावरील चॅटिंग चांगलीच महागात पडली. ओळख व चॅटिंगआड चक्क तिघांनी तिला शरीरसुखाची मागणी केली, अन्यथा तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अलीकडे त्यांनी तिचा पाठलाग चालविला, घरदेखील गाठले. त्यामुळे तिने पोलिस ठाणे गाठले. अखेर याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी तिघांविरुद्ध विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपींमध्ये मनीष रामेश्वर गायकवाड (२३), विशाल सुधीर बोंडे (३६) व देवानंद गजानन तेल्हारे (४३, तिघेही रा. अडुळाबाजार) यांचा समावेश आहे. यातील अल्पवयीन मुलगी सन २०२० मध्ये कोरोना असल्याने दर्यापूर येथील रूम सोडून स्वगावी परतली होती. त्यावेळी ती आरोपी मनीष गायकवाड याच्याशी फोन तसेच इन्स्टाग्रॉमवर बोलत होती. त्याचदरम्यान ती ट्यूशनसाठी देवानंद तेल्हारे याच्या ऑटोतून ये-जा करीत होती. त्यानंतर काही दिवसांनी मनीष गायकवाड याने तिचा पाठलाग सुरू केला. शारीरिक सुखाची मागणीदेखील केली. त्याला नकार दिला असता, तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते व्हायरल करतो, अशी धमकी तो तिला देऊ लागला.

बहिणीचे आयुष्य खराब करण्याची धमकी

मनीषने या सर्व बाबी आरोपी विशाल व देवानंदला सांगितल्या. त्यामुळे तेदेखील तिचा पाठलाग करून मानसिक त्रास देत होते. डिसेंबर २०२२ पासून तीनही आरोपींनी फिर्यादीला मारण्याची, तिच्या लहान बहिणीचे आयुष्य खराब करण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने दोन वर्षांपासून त्याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. 

गावात शिरून धमकी

१७ वर्षीय पीडिता ही दिवाळीनिमित्त तिच्या गावी आली असता, यंदाच्या ८ नोव्हेंबर रोजी तीनही आरोपी तिच्या गावात गेले. तिच्या घराजवळ जाऊन त्यांनी तू आम्हाला शरीरसुख दे, नाही तर अश्लील फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. फिर्यादी मुलीची गावामध्ये बदनामी देखील केली. २० नोव्हेंबरपर्यंत आरोपींचा पाठलाग सुरूच राहिला. त्यामुळे तिने तो सर्व प्रकार कुटुंबीयांच्या कानावर घातला तथा २४ नोव्हेंबर रोजी दर्यापूर पोलिस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगonlineऑनलाइनAmravatiअमरावती