शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
3
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
5
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
6
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
7
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
8
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
9
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
10
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
11
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
13
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
14
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
15
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
16
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
17
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
18
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
19
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
20
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
Daily Top 2Weekly Top 5

करजगावात विजयी मिरवणुकीवर दगडफेक

By admin | Updated: April 25, 2015 00:15 IST

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या भाजप व युवा क्रांती दलाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान

सात जखमी : आठ अटकेत, चौकाचौकांत एसआरपीच्या तुकड्याचांदूरबाजार : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या भाजप व युवा क्रांती दलाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान विरोधी गटाच्या घरासमोर झालेल्या नारेबाजीने भाजपा व प्रहारच्या कार्यकर्त्यात राडा झाला. दगडफेकीत दोन्ही गटाचे सात जण जखमी झाले असून त्यांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वरिष्ठांना देताच करजगावात एसआरपीच्या तुकड्यासह वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यात कालच ४२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला. त्या दरम्यान सर्वच तालुक्यात विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र तालुक्यातील करजगाव येथील भाजप व युवाक्रांती संघटनेच्या विजयी मिरवणुकीदरम्यान करजगाव येथील शिवाजी चौकात प्रहारच्या नेत्यांच्या घरासमोर नारेबाजी करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी बाहेरुन पोलीस बंदोबस्त बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना काल रात्री ९ वाजता घडली. तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्तघटनेच्या निषेधार्थ व सर्व आरोपीच्या अटकेसाठी आज करजगाव वासीयांनी बंद पाळला असून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून करजगावात अचलपूर, परतवाडा, सरमसपुरा, चांदूरबाजार पोलिसासह पोलीस मुख्यालय व एसआरपीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. शिरजगाव कसब्याचे ठाणेदार चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकरसह आसेगाव व चांदूरबाजारचा खुफीया विभाग परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहे.