सहायक कामगार आयुक्तांच्या खुर्चीला चपलांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 21:50 IST2018-01-30T21:49:55+5:302018-01-30T21:50:24+5:30

संप्तत रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सहायक कामगार आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे खुर्चीला चपलांचा हार घातला.

Chaplana necklace in the assistant commissioner's chair | सहायक कामगार आयुक्तांच्या खुर्चीला चपलांचा हार

सहायक कामगार आयुक्तांच्या खुर्चीला चपलांचा हार

ठळक मुद्देआंदोलन : रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्याचा संताप

आॅनलाईन लोकमत
अमरावती : संप्तत रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सहायक कामगार आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे खुर्चीला चपलांचा हार घातला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन दिले.
प्रमुख मागण्यामध्ये रतन इंडिया कंपनीमधील शासकीय नियमानुसार ९० टक्के स्थानिकांना स्थायी स्वरुपाच्या नोकºया देण्यात याव्यात. रतन इंडियामध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना वा कामगारांना भरीव वेतनवाढ देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी निवेदन दिले. यावेळी दीपक सरदार, भारत वानखडे, हिम्मत ढोले, उमेश इंगळे, करण गायकवाड, मनोज थोरात, रविश जावरे आदींचा समावेश आहे.

Web Title: Chaplana necklace in the assistant commissioner's chair