ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदा बदल
By Admin | Updated: July 7, 2015 00:10 IST2015-07-07T00:10:54+5:302015-07-07T00:10:54+5:30
राज्य कला संचालनालयाद्वारा घेण्यात येणाऱ्या (एलीमेंट्री व इंटरमिजिएट) या ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल ५० वर्षांनंतर बदल करण्यात आला आहे.

ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदा बदल
चित्रकलेची परीक्षा : ५० वर्षांनी झाला बदल, कल्पकतेवर भर, नव्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी
अमरावती : राज्य कला संचालनालयाद्वारा घेण्यात येणाऱ्या (एलीमेंट्री व इंटरमिजिएट) या ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल ५० वर्षांनंतर बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने कलात्मकतेवर भर देण्यात आला आहे.
इयत्ता ७ वी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात या रेखाकला परीक्षा घेण्यात येतात. अद्यापपर्यंत या अभ्यासक्रमात स्थिरचित्र, निसर्ग चित्र, स्मरण चित्र, संकल्प चित्र, मुक्तहस्तचित्र, भूमिती व अक्षरलेखन या विषयांचा समावेश होता. हे विषय विद्यार्थ्यांसाठी कठीण समाजले जाते. या अनुषंगाने या परीक्षेचा कठीण पातळी कमी करुन हा अभ्यासक्रम सोपा करुन विद्यार्थ्यांच्या कला-संस्कृती जोपासण्याचा दृष्टिकोनातून २००९ पासून परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने शिक्षण विभागाने नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली व हा नवीन अभ्यासक्रम २०१५ या नवीन शैक्षणिक सत्रापासून अमलात येणार आहे.
या परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल मुंबई येथे अभ्यासक्रम समिती सदस्यांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. हे सर्व सदस्य त्यांच्या विभागातील ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षा केंद्र संचालक असलेल्या कला शिक्षकांना ११ ते १३ जुलै या कालावधीत एक दिवसीय प्रशिक्षण देणार आहेत. नवीन अभ्यासक्रमाबाबत विदर्भ कला शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस महेशचंद्र राजगूरे, उपाध्यक्ष प्रशांत नवघरे, कोषाध्यक्ष सुनील नागपुरे, गणेश भुतडा, जगदीश नखाते, एस.आर. पाटील, अनिल लांडे, किशोर जिरापुरे, विलास शिरसाट, संजय ढाकुलकर आदींनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
असे आहेत अभ्यासक्रमातील बदल
निसर्ग चित्र या विषयाचा समावेश स्थिर चित्रात करण्यात आला. मुक्तहस्तचित्र या विषयाचा समावेश संकल्प चित्र या विषयात करण्यात आला. त्यामुळे सहाऐवजी चार विषय राहणार आहेत. परीक्षेचा कालावधी पाचऐवजी चार दिवसांचा करण्यात आला आहे