शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरच्या पंचायत समिती कार्यालयाला लागली गळती

By admin | Updated: August 7, 2015 00:28 IST

दोन दिवसांच्या सतत पावसामुळे पंचायत समिती कार्यालयाला गळती लागली. असून यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाज पुर्णत: प्रभावित झाले आहे.

चांदूरबाजार : दोन दिवसांच्या सतत पावसामुळे पंचायत समिती कार्यालयाला गळती लागली. असून यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कामकाज पुर्णत: प्रभावित झाले आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वात जास्त शासकीय कामे पंचायत समिती कार्यालयातच असतात त्यात घरकूल योजना, रोहयो शिक्षण विभाग, पाणीपुरवठा, आरोग्य, कृषी यासारखे महत्त्वाचे कामासाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये येत असतात. पण चांदूरबाजार पंचायत समितीची इमारत जुणी असून वर इंग्रजी कवेलूचे छत आहे. वानरामुळे हे कवेलू अनेक ठिकाणी फुटले असून त्यावर प्लास्टिक ताडपत्री टाकण्यात आली होती. पण हवेमुळे ही ताडपत्री उडून गेली व या दोन दिवसांचा पावसामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासहीत संपूर्ण पंचायत समिती कार्यालयात पाणी गळत होते.कार्यालयातील फायली ओल्या होऊ नयेत म्हणून कर्मचारी काळजी घेत होते. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी असतानादेखील नाईलाजाने कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागातून कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना आल्यापाऊली परत जावे लागत आहे. त्यात खंडविकास अधिकारी मागील अनेक दिवसापासून रजेवर गेले असल्याने कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. मात्र प्रभारी अधिकारीसुध्दा रजेवर गेले असल्याने पंचायत समिती कार्यालयाचा कारभार बोकाळला असून शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे.पंचायत समिती कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे, असे असले तरीही जर पाऊस असाच सुरु राहिल्यास पंचायत समितीचे कामकाज आणखी किती दिवस बंद राहणार हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे यासंबंधिक नागरिकांच्या येरझारा सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)