वरूड शहरात वीर शहीद भगतसिंग सेनेचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:13 IST2021-09-03T04:13:59+5:302021-09-03T04:13:59+5:30

फोटो - वरूड : शहरातील व तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत वीर शहीद भगतसिंग सेनेने स्थानिक वीर शाहिद भगतसिंग चौकात चक्काजाम ...

Chakkajam of Veer Shaheed Bhagat Singh Sena in Warud city | वरूड शहरात वीर शहीद भगतसिंग सेनेचा चक्काजाम

वरूड शहरात वीर शहीद भगतसिंग सेनेचा चक्काजाम

फोटो -

वरूड : शहरातील व तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत वीर शहीद भगतसिंग सेनेने स्थानिक वीर शाहिद भगतसिंग चौकात चक्काजाम आंदोलन केले . यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक करून सुटका केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रेस्ट हाऊसजवळ शहराच्या अग्रभागी उभारावा. सर्व वाॅर्डांमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा करावा आदी दहा मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अध्यक्ष जयंतराव कोहळे, संघटक दीपक निंबाळकर, प्रसिद्धीप्रमुख धनंजय गायकी, दिगंबर बानाईत , रवींद्र निस्वादे , अभिषेक जाधव , हर्षल बिजवे, पिंटू करडे, सारंग ठाकरे , गोविंद सिंग बावरी, चंद्रशेखर नागले, मोहन गोंडेकर, संजय राऊत, फाजीलभाईसह अनेकांची अटक करून सुटका करण्यात आली.

Web Title: Chakkajam of Veer Shaheed Bhagat Singh Sena in Warud city