सीईओंनी घेतला स्वच्छ भारत मिशनचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:17+5:302021-09-19T04:14:17+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारित राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खालील विविध ...

CEOs review Swachh Bharat Mission | सीईओंनी घेतला स्वच्छ भारत मिशनचा आढावा

सीईओंनी घेतला स्वच्छ भारत मिशनचा आढावा

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारित राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खालील विविध विषयांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी ओडीएफ व्हेरिफिकेशन पूर्ण, अंजनगाव सुजी व भातकुली तालुक्यातील मंजूर कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना सीईओंनी संबंधित दिल्या असून, याबाबत संबंधित गावाच्या ग्रामसेवकांची सीईओंनी सुनावणीही लावली आहे. यासोबत कोबो टूल वरील असमाधानकारक काम असलेल्या चिखलदरा येथील काम न करणाऱ्या ग्रामसेवकांना व बीडीओंनी सीईओंनी समज देऊन तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मोर्शी तालुक्यातील प्रलंबित कामे २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच अन्य विषयाचाही सीईओंनी आढावा घेतला. दिलेल्या मुदतीत मंजूर कामे मार्गी लावण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.

Web Title: CEOs review Swachh Bharat Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.