मध्यवर्ती कारागृहात कोराेना नियंत्रणात, सात कैदी क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:56+5:302021-03-20T04:12:56+5:30
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोना नियंत्रणात आला आहे. हल्ली सात कैदी होमगार्ड येथे साकारण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात भरती ...

मध्यवर्ती कारागृहात कोराेना नियंत्रणात, सात कैदी क्वारंटाईन
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोना नियंत्रणात आला आहे. हल्ली सात कैदी होमगार्ड येथे साकारण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात भरती आहेत. मात्र, एकही कैदी जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काेरोनाचा उपचार घेत नसल्याची माहिती आहे.
कारागृहात १ मार्च रोजी १० पुरुष, एक महिला बंदीजन एकूण ११ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, कारागृहाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या. परिणामी १९ दिवसांत कारागृहात बंदीजनांचा कोरोना संसर्ग होण्यापासून बचाव झाला. कैद्यांना मास्क अनिवार्य, सुरक्षित अंतर आणि गर्दी होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली. परिणामी दोन आठवड्यात कोरोना नियंत्रण मिळाले असून, आता केवळ सात कैदी पॉझिटिव्ह आहेत. कारागृहात समूह संसर्गाचा धोका बळावला असताना अचानक कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे. कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी दरम्यान ऑक्सिजन, ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण शोधण्यात आले. १९ दिवसांपूर्वी १० पुरुष, एक महिला बंदीजन एकूण ११ पॉझिटिव्ह असताना आता केवळ सात कैदी क्वारंटाईन आहेत. कारागृहात कोरोना नियमावलींचे कोेटेकोर पालन होत असताना १ मार्च २०२१ रोजी अंडा आणि सामान्य बराकीत प्रत्येकी एक असे दोन बंदीजन बाधित आढळले होते. १ मे २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान कारागृहात १६५ कैदी संक्रमित आढळले होते. त्यापैकी एक कर्मचारी, एक कैदी असे दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
-------------------
नवीन कैद्यांसाठी १४ दिवस क्वारंटाईनची नियमावली
न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्ह्यातील आरोपींची कारागृहात रवानगी झाल्यानंतर हल्ली कोरोना काळात १४ दिवस संबंधित कैद्याला क्वारंटाईन बंधनकारक आहे. दरम्यान कोरोना चाचणीनंतर जुने कारागृहात रवानगी केली जाते. येथील अंध विद्यालयात नव्या बंदीजनांसाठी क्वारंटाईन केंद्र साकारण्यात आले आहे. होमगार्डच्या विभागीय कार्यालयात क्वारंटाईन केंद्र स्थापन केले आहे.
-------------------
बंदीजनांची नियमित सर्दी, खोकला, तापाची तपासणी केली जात आहे. आता केवळ सात कैदी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीच्या तुलनेत कारागृहात कोरोना नियंत्रणात आहे.
- शीतल थोरात, वैद्यकीय अधिकारी, अमरावती मध्यवर्ती कारागृह